शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पुरुष संघ जर्मनीला रवाना

By admin | Updated: May 29, 2017 19:23 IST

भारतीय पुरुष हॉकी संघ तीन देशांच्या निमंत्रित स्पर्धेसाठी रविवारी जर्मनीला रवाना झाला. पुढील महिन्यात होणा-या हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि.29 -  भारतीय पुरुष हॉकी संघ तीन देशांच्या निमंत्रित स्पर्धेसाठी रविवारी जर्मनीला रवाना झाला. पुढील महिन्यात होणा-या हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून मनप्रितसिंहच्या नेतृत्वाखाली १८ खेळाडूंचा भारतीय संघ जर्मनी व बेल्जियमविरुद्ध दोन-दोन सामने खेळेल. हॉकी विश्व लीगसाठी संघ ९ जून रोजी लंडनला पोहोचेल. तेथे आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिना आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध सराव सामने खेळेल.  
डसेलडोर्फ येथे १ जूनपासून सुरू होणा-या या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण शिबिर बंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर पूर्ण झाले. जर्मनीला रवाना होण्यापूर्वी मनप्रितसिंहने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आम्ही सराव सामन्यांकडे नेहमी गंभीरतेने पाहतो. कारण या सामन्यांमुळे आगामी स्पर्धेसाठी खेळाडूंना लय गवसते. लीगमध्ये आम्ही कोणत्याही संघाला कमजोर समजणार नाही. आमचे लक्ष्य विजय नोंदवून तीन गुण संपादन करण्याचे असेल.
---------------------------
भारतीय संघाचे सामने :
 १५ जून : स्कॉटलंड, १७ जून : कॅनडा; १८ जून : पाकिस्तान, २० जून : नेदरलॅँड्स.
---------------
जर्मनी व बेल्जियम हे दोन्ही संघ रिओ आॅलिम्पिकमधील पदकविजेते संघ आहेत. अशा आघाडीच्या संघांविरुद्ध खेळल्याने हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत खेळताना आम्हाला नक्कीच मदत मिळेल. तसेच, आमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. शिवाय आम्हाला चुका सुधारण्याची संधीही मिळेल. ही स्पर्धा खेळताना आम्हाला कोणती रणनीती आखावी, याचासुद्धा अभ्यास करता येणार आहे. या दोन्ही संघांविरुद्ध आम्ही चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करू. त्यामुळे लंडन येथे होणा-या लीगचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज असू.   
- मनप्रितसिंह, कर्णधार