शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतीय’ नेतृत्वाची ‘कसोटी’

By admin | Updated: May 7, 2016 04:46 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वात खराब कामगिरीमुळे त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध

बंगलोर : आयपीएलच्या नवव्या पर्वात खराब कामगिरीमुळे त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध आज, शनिवारी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ‘दोन हात’ करणार आहे. हा सामना धोनी- विराटच्या नेतृत्वगुणांची ‘परीक्षा’ मानला जात आहे.उभय संघात चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, पण दोन्ही संघ कामगिरीत फ्लॉप ठरले. पुण्याने दिल्लीला नमवित विजयी पथावर येण्याचे संकेत दिले खरे, पण संघाचा नऊ सामन्यांत हा जेमतेम तिसराच विजय होता. बेंगळुरूनेसातपैकी केवळ दोन सामने जिंकल्याने सातव्या स्थानावर घसरला. दोन्ही संघांना विजयाशिवाय पर्याय नाही. कारण आणखी एक पराभव म्हणजे स्पर्धेबाहेर होणे असे समीकरण तयार आहे. स्टीव्हन स्मिथ, फाफ डुप्लेसिस, केव्हिन पीटरसन, मिशेल मार्श हे सर्वजण जखमी होऊन बाहेर पडले. अंतिम ११ खेळाडू निवडताना धोनीची दमछाक होत आहे. अजिंक्य रहाणे, सौरभ तिवारी, तिसारा परेरा, अशोक डिंडा हे मात्र कामगिरीत सातत्य राखून आहेत. यांच्याच कामगिरीमुळे संघाची इभ्रत शाबूत राहिली. रहाणे आणि उस्मान ख्वाजा यांनी दमदार फलंदाजी केली, तर रजत भाटियाने टिच्चून मारा केला. धोनीदेखील मधल्या फळीत योगदान देण्याचे प्रयत्न करीत आहे. अश्विन मात्र गोलंदाजीत अद्याप चमकताना दिसत नाही. पुण्याकडे चुका सुधारण्याची संधीही आता उरली नसल्याने गोलंदाजांना धावा रोखण्याचे मोठे आव्हान असेल. बेंगळुरु मागच्या सामन्यात कोलकाताकडून पाच धावांनी पराभूत झाला. स्पर्धेत सर्वांत चांगले गोलंदाज बेंगळुरुकडेच असूनही हा संघ धावा काढल्यानंतरही धावांचा बचाव करण्यात अपयशीच ठरतो. संघाच्या पराभवात खराब क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी कारणीभूत ठरली. केकेआरविरुद्ध तबरेज शम्सीने चार षटकांत तब्बल ५१ धावा मोजून प्रतिस्पर्धी संघाला विजय दान केला. यजुवेंद्र चहल आणि शेन वॉटसन हे धावा रोखून गडी बाद करतात, पण दुसऱ्या टोकाहून त्यांना साथ मिळत नसल्याने पराभवाची निराशा पदरी पडत आहे. (वृत्तसंस्था)