शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फुटबॉल संघाचा मुंबईत सराव

By admin | Updated: March 14, 2017 00:42 IST

आंतरराष्ट्रीय मैत्री सामना आणि एएफसी आशिया कप पात्रता फेरीतील आपल्या पहिल्या सामन्याआधी भारताच्या राष्ट्रीय संघाने सोमवारी पहिल्या सराव सत्रात

मुंबई : आंतरराष्ट्रीय मैत्री सामना आणि एएफसी आशिया कप पात्रता फेरीतील आपल्या पहिल्या सामन्याआधी भारताच्या राष्ट्रीय संघाने सोमवारी पहिल्या सराव सत्रात घाम गाळला. मुंबईतील शहाजी राजे क्रीडासंकुल स्टेडियममध्ये भारतीय संघाचे सराव शिबिर सुरू आहे.अंधेरी येथील स्टेडियममध्ये मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंचा सराव सुरू आहे. सराव सत्रानंतर कॉन्स्टेनर्टान म्हणाले, की जेव्हा राष्ट्रीय संघासोबत सराव करण्याची संधी मिळते, तो क्षण माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ क्षण असतो. हीच गोष्ट मी सर्वोत्तमरीत्या करू शकतो. माझ्या मते, गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही देशाला गौरवान्वित करण्याची कामगिरी केली आहे.आपल्या पुढील लक्ष्याविषयी कॉन्स्टेनटाईन म्हणाले, की आम्हाला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. मात्र, २०१९मध्ये यूएईला होणाऱ्या एएफसी आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरणे आमचे सध्या मुख्य लक्ष्य आहे.दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरासाठी १५ खेळाडू आले असून, आयलीग क्लब मोहन बागान आणि बंगळुरू एफसीसाठी खेळणारे काही मुख्य खेळाडू एएफसी कप सामन्यानंतर बुधवारी या शिबिरामध्ये सहभागी होतील. (क्रीडा प्रतिनिधी)