किंग्स्टन : अजिंक्य रहाणे (नाबाद ८३) व रिद्धिमान साहा (४७) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या ९८ धावांच्या महत्त्वपुर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने सोमवारी तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तोपर्यंत १६२ षटकात ६ बाद ४५६ धावांची मजल मारली होती. त्यावेळी अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला अमित मिश्रा (२१) साथ देत होता.त्याआधी, लोकेश राहुलने कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद ३५८ धावांची मजल मारली आणि यजमान संघाला बॅकफुटवर ढकलले. राहुलने १५८ धावांची खेळी केली. भारताने आतापर्यंत २६० धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवशी मात्र भारतीय फलंदाजांनी संथ फलंदाजी केली. भारताला ८८ षटकांत केवळ २३२ धावा फटकावता आल्या. दिवसअखेर रहाणे (४२) आणि साहा (१७) खेळपट्टीवर होते.रहाणे आणि साहा भारताला मोठी मजल मारुन देणार असे दिसत असताना साहाला पायचीत पकडून विंडिज कर्णधार जेसन होल्डरने ही जोडी फोडली. साहाने ११६ चेंडूत ५ चौकारांसह ४७ धावा काढल्या. मिश्राने आक्रमक फलंदाजी करताना ३५ चेंडूत नाबाद २१ धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)>धावफलकवेस्ट इंडिज पहिला डाव १९६. भारत पहिला डाव :- लोकेश राहुल झे. डाऊरिच गो. गॅब्रियल १५८, शिखर धवन झे. ब्राव्हो गो. चेज २७, चेतेश्वर पुजारा धावबाद ४६, विराट कोहली झे. चंद्रिका गो. चेज ४४, अजिंक्य रहाणे खेळत आहे ८३, रविचंद्रन अश्विन पायचित गो. बिशू ०३, रिद्धिमान पायचीत गो. होल्डर ४७, अमित मिश्रा खेळत आहे २१. अवांतर (२७). एकूण १६२ षटकांत ६ बाद ४५६. बाद क्रम : १-८७, २-२०८, ३-२७७, ४-३१०, ५-३२७, ६-४२५ गोलंदाजी : गॅब्रियल २८-८-६२-१, कमिन्स २३.४-४-८२-०, होल्डर ३४.२-१२-७२-१, चेज ३२-४-९६-२, बिशू ३५-५-१०७-१, ब्रेथवेट ९-०-२६-०.
विंडीजविरुद्ध भारताचे वर्चस्व
By admin | Updated: August 2, 2016 04:28 IST