शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सायकलपटू आशियाई स्पर्धेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:09 IST

पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सायकलपटू पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सायकलपटू पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सायकलिंगची सुरुवात १९५१ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली झाली होती. त्यात भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व दोन कांस्य, अशा एकूण तीन पदकांची कमाई केली होती; परंतु त्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेत कधीही पदक जिंकू शकला नाही.भारतीय सायकलपटू नयना राजेश आणि ई. चाओबा देवी यांची या वेळेस तयारी चांगली असून, संघ पदकाचा दावेदार असेल, असे सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच खेळण्यास सज्ज असणाºया नयनाने म्हटले, ‘आमची तयारी चांगली आहे. मी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत सहभागी होत आहे; परंतु आमचे जास्त लक्ष चार खेळाडूंच्या सांघिक स्पर्धेवर आहे. त्यात आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत.’ गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारी चाओबा म्हणाली, ‘मी या स्पर्धेत दुसºयांदा जात आहे; परंतु मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जास्त अनुभव नाही. याआधी मी २0१४ आशियाई आणि २0१६ मध्ये गुवाहाटीत झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. यावेळी पदकांची प्रतीक्षा संपेल, अशी आशा आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून महासंघाने आम्हाला चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत.’भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव ओंकार सिंग म्हणाले, ‘आशियाई स्पर्धेत आमचे १५ खेळाडू सहभागी होत आहेत. स्प्रिटिंग संघ गेल्या तीन महिन्यांपासून जर्मनीत तयारी करीत आहे. वैयक्तिक स्पर्धेतील खेळाडू दिल्लीत तयारी करीत आहेत. पदकांच्या शक्यतेविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही. आमचा प्रवास तीन वर्षांआधीपासून सुरू झाला आणि पदकापर्यंत पोहोचण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी हवा.’