शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

खुशी भारतीय बास्केटबॉल संघात, बंगळुरूला रंगणार आशियाई स्पर्धा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 01:17 IST

रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

औरंगाबाद : रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. बंगळुरू येथे २२ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणाºया १६ वर्षांखालील आशियाई बास्केटबॉल स्पर्धेसाठी खुशी डोंगरे हिची भारतीय संघात निवड झाली आहे.देवगिरी महाविद्यालयात ११ वी इयत्तेत शिकणारी खुशी डोंगरे ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी मराठवाड्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. राजनंदनगाव, छत्तीसगढ येथील युगांतर पब्लिक स्कूल येथे झालेल्या भारतीय संघाच्या सराव शिबिरातून तिची भारतीय संघात निवड झाली.विशेष म्हणजे गतवर्षी एप्रिल महिन्यातदेखील तिची संभाव्य भारतीय संघात निवड झाली होती. या संभाव्य संघाचे शिबीरदेखील छत्तीसगढ येथेच झाले होते. बेगमपु-यातील औरंगाबाद चॅम्पियन क्रीडा मंडळात सराव करणाºया खुशीने आतापर्यंत अवघ्या दीड वर्षातच भारतीय संघात स्थान मिळवले आहे. तिने २०१५-२०१६ या वर्षातच कर्नाटकातील हसन, छत्तीसगड, नोएडा आणि हैदराबाद येथील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे तिने ८ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. जबरदस्त फिटनेस राखणाºया खुशीने वयाच्या १२ व्या वर्षापासून प्रशिक्षक संदीप ढंगारे आणि वडील अ‍ॅड. संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉल खेळाचा श्रीगणेशा केला. 

टॅग्स :Sportsक्रीडा