शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

भारतीय बॅडमिंटनपटूंची घोडदौड! सायना, सिंधू, श्रीकांत, प्रणिथ उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 22, 2017 20:00 IST

ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. महिला एकेरीमध्ये भारताच्या

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 22 -  ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. महिला एकेरीमध्ये भारताच्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी तर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि प्रणिथ यांनी विजयी घोडदौड कायम ठेवत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
आज रंगलेल्या लढतींमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतने कोरियाच्या सोन वान हो याच्यावर 15-21, 21-13, 21-13 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुरुष एकेरीतील अन्य एका लढतीत भारताच्या साई प्रणिथने चीनच्या हुआंग युझियांगवर 21-15, 18-21, 21-13 असा विजय मिळवला.
 महिला एकेरीमध्येही  भारतीय बॅडमिंटनपटूंचाच बोलबाला दिसून आला. महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन शिझियांग हिच्यावर 21-13, 21-18 अशी  सरळ गेममध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायना नेहवालला मात्र विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिने अटीतटीच्या लढतीत मलेशियाच्या सोनिया चेन हिचे आव्हान 21-15, 20-22, 21-14 असे परतवून लावत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट पक्के केले.  
तत्पूर्वी काल झालेल्या सलामीच्या लढतींमध्ये किदाम्बी श्रीकांतसह, गतविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारत विजयी सलामी दिली होती. मात्र इंडोनेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठलेला एचएस प्रणॉय, अजय जयराम आणि पारुपल्ली कश्यप या खेळाडूंना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.