शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी विजय

By admin | Updated: January 29, 2017 23:02 IST

इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - इंग्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत भारताला निसटता विजय मिळवण्यात यश आलं आहे. इंग्लंडची भारतानं दिलेलं 144 धावांचा पाठलाग करताना पुरती दमछाक उडाली आहे. आशिष नेहराच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहेत. नेहरानं बिलिंग्स, रॉय आणि स्ट्रोक्सला माघारी धाडून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. बुमराहनं इंग्लंडच्या रुट आणि बटलरला तंबूत पाठवून भारताचा विजय सुनिश्चित केला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी आठ धावांची गरज असतानाच बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने षटकात दोन विकेट्स घेतल्या असून, इंग्लंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना बुमराहने फलंदाजांना संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-20 मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराहला 'मॅन ऑफ द मॅच' या किताबानं गौरविण्यात आलं आहे.इंग्लंडच्या स्ट्रोक्सनं 27 चेंडूंत 2 षटकारांसह 2 चौकार लगावत 38 धावांची खेळी करून इंग्लंडच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. भारताकडून लोकेश राहुलने एकाकी झुंज देताना 71 धावा फटकावल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने यजमान संघाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रैना (7) आणि युवराज सिंग (4) हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर राहुल (71) आणि मनीष पांडे (30) यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी करत संघाला 100 पार पोहोचवले.