शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

भारत प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार

By admin | Updated: June 24, 2015 05:31 IST

बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखण्यासह

मीरपूर : बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखण्यासह यजमान संघाला क्लीन स्वीप करण्यापासून रोखण्याचे आव्हान आहे. पहिल्या दोन लढतींत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ टीकेचे लक्ष्य ठरला आहे, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघसहकाऱ्यांची पाठराखण करताना संघात उपलब्ध सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असल्याचे म्हटले आहे. पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या लढतीत ६ गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही लढतींत यजमान संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात भारतीय संघापेक्षा सरस कामगिरी केली. भारतीय संघ अखेरच्या लढतीत विजयासह आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. यंदा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघासाठी मालिकेत ‘व्हाईटवॉश’लाजीरवाणी बाब ठरेल. आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी करावी लागेल. आघाडीच्या फळीतील फलंदाज चांगल्या फॉर्मात नसून मधल्या फळीतील फलंदाजही उपयुक्त भागीदारी करण्यात अपयशी ठरले आहेत. उमेश यादव व मोहित शर्मा यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांना बांगलादेशातील खेळपट्ट्यांवर धावगतीवर अंकुश राखण्यात अपयश आले. फिरकीपटू अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांनाही छाप सोडता आली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करताना बांगलादेशने खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वक्रिकेटमध्ये त्यांचा दर्जा उंचावत असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानला अलीकडेच क्लीनस्वीप देणाऱ्या मशरफी मूर्तजाच्या नेतृत्वाखालील संघ भारताविरुद्धही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. बांगलादेशच्या फलंदाजांनी दोन्ही लढतींत चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ३०७ धावा फटकाविणाऱ्या बांगलादेशला गोलंदाजीमध्ये नवा हीरो मुस्तफिजूर रहमान गवसला आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या दोन सामन्यांत ११ बळी घेत इतिहास नोंदवताना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.आकड्यांचा विचार करता, बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारताचे पारडे वरचढ भासत असले, तरी फॉर्मचा विचार करता बांगलादेश क्लीन स्वीपचा प्रबळ दावेदार आहे. आपण क्लीन स्वीप करण्याचे अतिरिक्त दडपण घेणार नसल्याचे बांगलादेशाचा कर्णधार मूर्तजाने स्पष्ट केले. मूर्तजा म्हणाला, ‘‘कसलेच दडपण नाही. मालिकेपूर्वी कुणीच भाष्य केले नव्हते, की आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरू.’’ भारतानेही आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसल्यामुळे आम्ही मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोनी म्हणाला, ‘‘आमच्याकडे उपलब्ध सर्वोत्तम खेळाडू आहेत; पण त्यांना येथील परिस्थितीसोबत जुळवून घेता आलेले नाही.’’रविवारी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘‘उपखंडात खेळताना अतिरिक्त फिरकीपटूसह खेळायचे किंवा नाही, याचा विचार करावा लागेल. भुवनेश्वर कुमार वेगाने मारा करीत नाही; पण तरी तो धावगतीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे सर्वोत्तम समतोल कसा राखता येईल, यावर लक्ष द्यावे लागेल.’’(वृत्तसंस्था)