शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भारत ‘प्लेआॅफ’मधील स्थान पक्के करणार

By admin | Updated: July 17, 2015 03:25 IST

भारतीय संघ उद्या येथे डेव्हिस कप एशिया ओशियाना ग्रुप एच्या लढतीत न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी उतरेल तेव्हा त्यांचे लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघाला

ख्राईस्टचर्च : भारतीय संघ उद्या येथे डेव्हिस कप एशिया ओशियाना ग्रुप एच्या लढतीत न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी उतरेल तेव्हा त्यांचे लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करून प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचे असेल. या लढतीत विजयी ठरणारा संघ विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये स्थान मिळविणार आहे.भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या फेरीच्या या लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. येथील तापमान ५ ते ७ अंशांच्या जवळपास आहे आणि भारतीय खेळाडूंना अशा हवामानात खेळण्याची सवय नाही. हा सामना वाइल्डिंग पार्क टेनिस सेंटरच्या इनडोअर कोर्टवर खेळवला जाणार आहे. कागदावर भारतीय संघ न्यूझीलंडच्या तुलनेत खूप तुल्यबळ आहे. भारताकडे एकेरीतील सोमदेव देववर्मन (१४८), युकी भांबरी (१५१) हे यजमानांच्या तुलनेत अधिक रँकिंगचे खेळाडू आहेत.विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या बोपन्नाच्या उपस्थितीने संघाची ताकद आणखी वाढली आहे. तो दुहेरीत वैयक्तिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. त्याच्याबरोबर साकेत मायनेनी असेल. न्यूझीलंड संघात जोस स्टॅथम हा सर्वांत चांगली क्रमवारी असणारा खेळाडू आहे. त्याची क्रमवारी ३४५ आहे, तर मायकेल व्हीनस एकेरीत खेळणार आहे. त्याचे रँकिंग ५४८ आहे. दुहेरीत तो टॉप ५०मध्ये आहे. त्याचप्रमाणे आर्टम सिताक (४३) आणि मार्कस डॅनियल (६६) हेदेखील दुहेरीच्या अव्वल १००मध्ये आहेत.तथापि, अमेरिकेत चॅलेंजर टुर्नामेंट जिंकून येथे पोहोचणाऱ्या संघाला सहज घेऊन चालणार नाही, असे सोमदेव म्हणाला. तो म्हणाला, की येथील परिस्थिती खरोखरीच आमच्यासाठी प्रतिकूल आहे. येथील हवामानात खेळण्याची सवय नाही आणि त्यांच्या खेळाडूंविरुद्ध आम्हाला गांभीर्यानेच खेळावे लागेल. येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या खेळाडूंनी चांगले टेनिस खेळले आहे. त्यांनी या वर्षाच्या प्रारंभी चीनसारख्या तुल्यबळ संघाला पराभूत केले आहे.तो पुढे म्हणाला, की स्टॅथम आणि व्हीनस यांनी एकेरीत मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे. काय करायला हवे, हे त्यांना चांगले माहीत आहे. विशेषत: ते न्यूझीलंडमध्ये खतरनाक आहेत. मला आणि युकीला उद्या चांगले आव्हान मिळण्याची आशा आहे.युकीचा माजी दुहेरीचा जोडीदार व्हीनस पहिल्या सामन्यात सोमदेवशी दोन हात करील. याविषयी युकी म्हणतो, की मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तो जेव्हा लयीत असतो तेव्हा खतरनाक खेळाडू असतो आणि सोमदेवसाठी ही लढत सोपी असणार नाही. या लढतीतील विजयी ठरणारा संघ सप्टेंबर महिन्यात विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये खेळणार आहे.