शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भारत अव्वल ५० देशांमध्ये नक्की येईल

By admin | Updated: July 29, 2016 01:14 IST

भारतात सध्या रग्बीचा जोर वाढत असून युवांमध्ये रग्बीचे क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली असून येणाऱ्या काही वर्षांत नक्कीच भारत

मुंबई : भारतात सध्या रग्बीचा जोर वाढत असून युवांमध्ये रग्बीचे क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली असून येणाऱ्या काही वर्षांत नक्कीच भारत अव्वल ५० संघांमध्ये असेल, असा विश्वास आशियाई रग्बी संघटनेचे उपाध्यक्ष आगा हुसैन यांनी केले. भारतात रग्बी खेळाचा अधिक प्रसार करण्यासाठी आणि राष्ट्रीय संघाला सहाकार्य करण्यासाठी नुकताच भारतीय रग्बी संघटनेने आंतरराष्ट्रीय रग्बी क्षेत्रातील नावाजलेल्या प्रायोजकासह करार केला. या अंतर्गत बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आगा यांनी आपले मत व्यक्त केले.‘‘जागतिक क्रमवारीत सध्या भारतीय संघ ७७ व्या स्थानी आहे. तर ३२ संघांच्या आशियाई क्रमवारीत भारतीय संघ १२व्या स्थानी आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय रग्बीला असेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळत राहिले, तर नक्कीच जगातील अव्वल ५० देशांमध्ये भारताचा समावेश झालेला पाहण्यास मिळेल,’’ असेही आगा यांनी यावेळी सांगितले.रग्बी इंडियाचे जनरल सेक्रेटरी महेश मथाई यांनी सांगितले की, ‘‘काही वर्षांपासून रग्बीला भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुर्वी एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित असलेला हा खेळ आज देशातील प्रत्येक राज्यात खेळला जात आहे. विशेष म्हणजे शालेय खेळाडूंसह महिला खेळाडूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग झाला असल्याने खऱ्या अर्थाने हा खेळ आज भारतात रुजू लागला आहे. ’’ (क्रीडा प्रतिनिधी)