शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत अव्वलस्थानी, विश्वचषक नेमबाजी; स्मित सिंग १५ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:25 IST

आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) आयोजित विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एकही पदक जिंकले नाही.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) आयोजित विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एकही पदक जिंकले नाही. मात्र असे असले तरी या स्पर्धेत भारतीय संघ पदकतालिकेत चार सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह अव्वल क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत प्रथमच एकूण नऊ पदाकांसह भारतीय नेमबाजांनी बाजी मारली आहे.सोमवारी पुरुषांच्या स्किट प्रकारात दोन वेळा आॅलिम्पिक विजेता अमेरिकेच्या व्हिन्सेंट हैनकॉकने पात्रता फेरीत १२५ पैकी १२३, तर अंतिम फेरीत ६० पैकी ५९ गुणांचे लक्ष्य साधून जागतिक विक्रमाची बरोबरी केली. आॅस्ट्रेलियाच्या पॉल एडम्सने व्हिन्सेंटच्या गुणांची बरोबरी साधली; पण शूटआॅफमध्ये हैनकॉकने एडम्सचा ६-५ गुणांनी पराभव केला. इटलीच्या ताम्मारो कास्सांद्रोला अंतिम फेरीत ४९ गुणांसह कांस्यपदावर समाधान मानवे लागले. या प्रकारात पात्रता फेरीत भारताच्या स्मित सिंगला ११६ गुणांसह १५ व्या क्रमांकावर राहावे लागले.स्पर्धेत भारताच्या शाहजार रिजवी, मनू भाकर, अखिल शेरॉन व ओम प्रकाश मिथार्वल यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते. अंजुम मौदगिलने रौप्य, तर जितू राय व रवीकुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)