दुबई : भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानांकनात तिस:या क्रमांकावर ङोप घेण्याची संधी आह़े मात्र यासाठी भारताला इंग्लंडविरुद्ध 9 जुलैपासून सुरू होणा:या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सरशी साधावी लागेल.
कसोटी संघांच्या ताज्या मानांकनात भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर विराजमान आह़े भारताच्या खात्यात सध्या 1क्2 रेटिंग गुण आहेत, तर इंग्लंडचे 1क्क् गुण आहेत़ जर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सरशी साधली तर पाकिस्तानला मागे टाकून भारत तिस:या क्रमांकावर विराजमान होऊ शकतो़ दरम्यान, या मालिकेतील पाचही सामने जिंकल्यास इंग्लंड संघ सातव्या क्रमांकावर फेकला जाईल़ दुसरीकडे इंग्लंडने मालिकेवर 4-क् असा कब्जा केल्यास भारत सातव्या स्थानावर फेकला जाऊ शकतो़
फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ए़ बी़ डीव्हिलियर्स अव्वल क्रमांकावर विराजमान आह़े श्रीलंकेचा कुमार संगकारा दुस:या आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला तिस:या क्रमांकावर कायम आह़े भारताचा चेतेश्वर पुजारा सातव्या आणि विराट कोहली 1क् व्या स्थानावर आह़े
गोलंदाजांमध्ये आफ्रिकेचा डेल स्टेन अव्वल क्रमांकावर विराजमान आह़े ऑस्ट्रेलियाचा रियान हॅरीस दुस:या स्थानावर आणि आफ्रिकेचा वर्नेन फिलँडर तिस:या क्रमांकावर कायम आह़े गोलंदाजी मानांकनात भारताचा आऱ अश्विन सातव्या क्रमांकावर विराजमान आह़े
ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिका दुस:या, पाकिस्तान तिस:या, भारत चौथ्या, इंग्लंड पाचव्या क्रमांकावर विराजमान आह़े त्यानंतर श्रीलंका (6), न्यूझीलंड (7), वेस्ट इंडीज (8), ङिाम्बाब्वे (9), बांगलादेश (1क्) यांचा क्रमांक लागतो़