शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

भारत अ संघाचे रौप्य पदकावर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:07 IST

चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्स संघाचा ३-२ गेममध्ये पराभव करून ७ व्या जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक जिंकले.

पुणे : भारतीय मुलांच्या अ संघाने सिलेक्टेड टीम प्रकारात रविवारी शेवटच्या साखळी लढतीत चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्स संघाचा ३-२ गेममध्ये पराभव करून ७ व्या जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक जिंकले. फ्रान्सविरूध्द झालेल्या सामन्याचे शिल्पकार तरूण मन्नेपल्ली, वरून त्रिखा ठरले. चिनी तैपई संघाने सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला.क्रीडा व युवक सेवासंचालनालय, महाराष्टÑ शासनाच्यावतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत रविवारी झालेल्या गटातील अखेरच्या लढतीत भारताने फ्रान्सवर ३-२ गेमने विजय मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुहेरीच्या पहिल्या लढतीत केन्जी लोव्हँग-विलियम व्हिलेगर जोडीने रितूपर्णा बोरा-पारस माथूर जोडीवर २१-१३, २३-२१ गुणांनी मात करून फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दुहेरीत तरुण मन्नेपल्ली-वरुण त्रिखा जोडीने ५४ मिनिटे झालेल्या लढतीत मार्टिन क्वाझेन-लैलना राहरी जोडीवर १६-२१, २६-२४, २१-१९ गुणांनी विजय मिळवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर एकेरीत तरुणने लेओवर २१-१७, १७-२१, २१-७ गुणांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. नंतर एक तास चाललेल्या लढतीत वरुणने मार्टिनवर १७-२१, २७-२५, २१-१५ गुणांनी विजय मिळवला आणि भारताला ३-१ अशी स्थिती केली. वरुणने पराभवाच्या उंबरठ्यावरवरून विजय खेचून आणला. वरुणने पहिला गेम गमावल्यानंतर दुस-या गेममध्ये सुरुवातीपासूनच दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. यानंतर २५-२५ अशी बरोबरी असताना वरुणने सलग दोन गुण घेत बाजी मारली आणि आपले आव्हान राखले. आत्मविश्वास उंचावलेल्या वरुणने निर्णायक गेममध्ये मार्टिनला संधीच दिली नाही. यानंतर एकेरीतील अखेरच्या लढतीत विलियमने मोनिमुग्धा राजकंवरला २१-१२, १५-२१, २१-१४ असे पराभूत केले, पण त्याचा निकालावर काही परिणाम झाला नाही.भारत ब संघाचा पराभव....मुलांच्या गटात भारत ब संघाला ब्राझीलकडून ०-५ गेमने पराभव पत्करावा लागला. यात दुहेरीत पेड्रो टिटो-थिअ‍ॅगो मोझेर जोडीने मिहिर-नमराज जोडीवर २-० अशी, तर लुकास सिल्वा-मॉईसेस लिमा जोडीने अभिनव-अर्णव जोडीवर २-० अशी मात करून ब्राझीलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एकेरीत थिअ‍ॅगोने मिहिरला सहज पराभूत करून ब्राझीलला विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर पेड्रोने मिहिरला, तर मॉइसेसने अभिनवला पराभूत केले.सिलेक्टेड टीम प्रकारात मुलांच्या गटात एकूण सात संघ होते. यात चिनी तैपेईने गटातील सहाच्या सहा लढती जिंकून १२ गुणांसह विजेतेपद संपादन केले. भारत अ संघाने सहा पैकी पाच लढती जिंकून १० गुणांसह उपविजेतेपदावर कब्जा केला. भारतीय अ संघाला गटातील लढतीत चिनी तैपेईकडून १-४ गेमने पराभव पत्करावा लागला. मात्र भारत अ संघाने चीनला ४-१, ब्राझीलला ५-०, यूएईला ५-०, भारत ब संघाला ५-० व फ्रान्सला ३-२ गेममध्ये पराभूत केले.

टॅग्स :Sportsक्रीडाBadmintonBadminton