शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

भारताचा द. आफ्रिकेवर २२ धावांनी विजय

By admin | Updated: October 14, 2015 20:56 IST

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीमुळे आणि गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिऴवला.

ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. १४ - कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीमुळे आणि गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिऴवला.  या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी  २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाना २४८ धावांचा पल्ला गाठता आला नाही.  दक्षिण आफ्रिकेने ४३.४ षटकात २२५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाज फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक  ५१ धावा केल्या, त्याला अक्षर पटेलने झेलबाद केले. तर,  एबी डिव्हिलियर्स (१९),  हाशिम अमला (१७), क्विंटन डिकाक (३४), जेपी ड्युमिनी (३६), डेव्हिड मिलर (०), 
फरहान बेहारदिन (१८), इम्रान ताहिर (९), डेल स्टेन (१३), मोर्नी मोर्कल (४) तर कागिसो रबादाने नाबाद १९ धावा केल्या. 
भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि  भुवनेश्वर कुमारने तीन बळी टिपले, तर,  हभजन सिंगने दोन आणि उमेश यादव व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाल्याने संघाला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर भारताची पडझड सुरूच राहिली. मात्र अजिंक्य रहाणेने ५१ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. भारतीय संघ २०० धावाही करू शकेल की नाही अशी भीती वाटत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद ९२ धावांची शानदार खेळी करत २४८ धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात रोहित शर्मा (३), धवन (२३), कोहली (१२), रैना (०), अक्षर पटेल (१३), भुवनेश्वर कुमार (१४), हभजन सिंग (२२) आणि उमेश यादवने ४ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाज डेल स्टेनने ३, मॉर्केल व ताहिरने प्रत्येकी २ आणि रबाडाने १ बळी टिपला.
दक्षिण आफ्रिका संघाच्या सुरू असलेल्या दौऱ्यात यजमान भारतीय संघाचा हा पहिलाच विजय आहे. दोन टी-२० सामने गमावणाऱ्या भारतीय संघाला कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीतही पराभवाला सामोरे जावे लागले होते.