शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

भारत-पाकिस्तान लढतीची रंगतच न्यारी

By admin | Updated: June 4, 2017 06:01 IST

भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना

- सुनील गावसकर लिहितात...भारत-पाकिस्तान क्रिकेटची रंगतच न्यारी असते. उभय संघ श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लढतीत चुरस अनुभवायला मिळते. देशातर्फे खेळताना खेळाडंूमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना भिनलेली असते आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना ती अधिक जोमाने उफाळून येते. सध्या सीमेवर तणावाची स्थिती बघता पूर्वीच्या तुलनेत यावेळच्या भारत-पाक लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाडू मात्र लढतीच्या हाईपमध्ये वाहवत न जाता दडपण झुगारून खेळण्यास सज्ज असतील, हे मात्र निश्चित. या लढतीमुळे ‘हीरो’ किंवा ‘झिरो’ ठरू शकतो, याची प्रत्येक खेळाडूला कल्पना आहे. पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या अनुभवाचा विचार करता भारतीय संघाचे पारडे थोडे वरचढ भासते. मिसबाह, युनूस आणि आफ्रिदी या खेळाडूंचा समावेश नसल्यामुळे पाक संघाला अनुभवाची उणीव भासत आहे. पाकिस्तानने युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्या उत्साहाच्या जोरावर ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या लढतीच्या निमित्ताने पाकच्या युवा खेळाडूंना छाप सोडण्याची चांगली संधी लाभली आहे. सराव सामन्यांत पाक संघाची कामगिरी चांगली ठरल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ आपल्या प्रशिक्षकांच्या अनावश्यक वादासह स्पर्धेत दाखल झाला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही तर त्यासाठी हा वादच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात येईल. व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे हा वाद विसरून चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतील, पण ड्रेसिंग रुममधील अनिश्चितता मैदानावरील चुकीपेक्षा जास्त त्रासदायक असते. यावेळी भारताचा वेगवान मारा चांगला आहे. सर्वंच गोलंदाज अचूक व वेगवान मारा करीत आहेत. ढगाळ वातावरणात गोलंदाजांना चांगला स्विंग मिळेल; पण पाकच्या गोलंदाजांनाही त्याचा लाभ मिळेल. भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अधिक अनुभव आहे. युवराज फिट असेल तर रहाणेला बाहेर बसावे लागेल. भारतीय संघाची निवड करताना संघव्यवस्थापनाला एक प्रश्न मात्र भेडसावणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या शमीला खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला आहे का ? या महत्त्वाच्या लढतीत त्याला संधी देण्याची जोखीम पत्करता येईल का? (पीएमजी)