शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार

By admin | Updated: November 18, 2016 00:01 IST

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्र्ध्यांमधील क्रिकेट संबंध ताणले गेले असताना, महिला आशिया चषक स्पर्धेत मात्र दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत.

कराची : भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्र्ध्यांमधील क्रिकेट संबंध ताणले गेले असताना, महिला आशिया चषक स्पर्धेत मात्र दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत. २५ नोव्हेंबरपासून थायलंड येथे होणाऱ्या टी-२० महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारताने सहमती दिली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) सांगितले.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की, ‘‘दोन्ही देशांमधील राजकीय तणाव पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह (आयसीसी) चर्चा करू, की कोणत्याही स्पर्धेत भारत-पाकिस्तान साखळी सामन्याचे आयोजन करू नये.’’ ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर आशिया चषक स्पर्धेतील या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग पसरले होते.मात्र, आता पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-पाक सामना होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी माहिती दिली, की केपटाऊन येथे झालेल्या मागच्या आयसीसी बैठकीत आम्ही हा मुद्दा गांभीर्याने उचलला होता आणि भारताने सांगितले, की त्यांना द्विपक्षीय मालिकेत आमच्यासह खेळण्यास अडचण होती. परंतु, आयसीसी स्पर्धेमध्ये मात्र ते आमच्याविरुद्ध खेळतील.तसेच, पाकिस्तानी दलाचे  प्रमुख नजीम सेठी यांनी भारत-पाक संबंधावर ठाकूर यांनी केलेल्या वक्त्यव्याची प्रसारमाध्यमांतील कात्रणं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सोपविली असल्याची माहितीही सूत्रांनी या वेळी दिली. (वृत्तसंस्था)