शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे २४६ धावांची आघाडी, वेस्ट इंडिज १ बाद १०७

By admin | Updated: August 11, 2016 06:03 IST

भारताने दिलेल्या ३५३ धावाचा पाठलाग करताना यजमानांनी संयमी फलंदाजी केली. ४७ षटकात १ बाद १०७ धावा केल्या.

ऑनलाइन लोकमतसेंट लुसिया, दि. ११ : प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर अश्विन-साहा यांनी सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक भागीदारी करत भारताला सावरले. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३५३ धावा केल्या. भारताने दिलेल्या ३५३ धावाचा पाठलाग करताना यजमानांनी संयमी फलंदाजी केली. ४७ षटकात १ बाद १०७ धावा केल्या. ब्रेथवेट ५३ तर ब्रावो १८ धावावर खेळत आहेत. राहुलने जॉन्सनला धावबाद करत भारताला एकमात्र यश मिळवून दिले. दरम्यान, आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साहा (१०४) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३५३ धावा उभारल्या.डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमानांनी भारताचे आघाडीचे ५ फलंदाज बाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत अश्विन - साहा यांनी त्यांना बळी घेण्यापासून रोखले. ५ बाद २३४ या धावसंख्येपासून सुरुवात करताना या जोडिने पहिल्या सत्रात ८२ धावांची भर टाकली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक आत्मविश्वासाने खेळताना अश्विन - साहा जोडिने दमदार खेळ करताना यजमानांचा चांगलाच सामाचार घेतला.अश्विनने २९७ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व एका षटकारासह दमदार ११८ धावांची संयमी आणि निर्णायक खेळी केली आहे. तर त्याला मोलाची साथ दणाऱ्या साहाने २२७ चेंडूत १३ चौकारांसह १०४ धावा फटकावल्या. अल्झारी जोसेफने साहाला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर अवघ्या १४ धावांत ४ बळी गेल्याने भारताचा डाव संपुष्टात आला. अष्टपैलू रविंद्र जडेजा (६) झटपट परतल्यानंतर भुवनेश्वर कुमार व इशांत शर्मा खेळपट्टीवर हजेरी लावून गेले. तर मिग्युएल कमिन्सने अश्विनला बाद केले. सामन्यादरम्यान झालेले विक्रम -- विदेशामध्ये भारताकडून सहाव्या विकेटसाठी अश्विन - साहा यांनी केलेली सर्वोत्तम तिसरी भागीदारी.- विंडिज विरुध्द चार किंवा त्याहून अधिक शतक झळकावणारा अश्विन भारताचा सहावा फलंदाज. - विदेशात शतक झळकावणारा साहा चौथा भारतीय यष्टीरक्षक.-पहिल्यांदाचा एकाच कसोटी डावात भारताच्या सहाव्या व सातव्या क्रमांकावरील फलदाजांनी शतकी खेळी केली. - एकाच मालिकेत दोनहून अधिक ५० हून धावा आणि २ हून अधिक वेळा डावात ५ बळी अशी कामगिरी केलेला अश्विन केवळ    तिसरा भारतीय.- कसोटी क्रिकेटमध्ये सलामी गोलंदाजी करणारा अलझारी जोसेफ वेस्ट इंडिजचा सर्वात युवा गोलंदाज ठरला.