शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

पाकला धूळ चारत भारताने पटकावला टी-२० विश्वचषक

By admin | Updated: February 12, 2017 16:10 IST

दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतवेळच्या विजेत्या भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 12 - दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतवेळच्या विजेत्या भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टी-२०विश्वचषकावर नाव कोरलं आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने विजेतेपद राखले. प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने 197/9 धावांचा डोंगर उभा केला होता. 198 धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या दहा षटकात बिनबाद 109 धावांकरत कडवे आव्हान दिले. अजय कुमार रेड्डी आणि प्रकाश जयरामय्या या सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. अजय रेड्डी 43 धावा काढून धावबाद झाला. मात्र तोपर्यंत भारतीय संघ विजयासमीप आला होता. संघाच्या 163 धावा झाल्या असताना रेड्डी माघारी परतला. पाकिस्तानने दिलेले 198 धावांचे आव्हान भारताने 18 व्या षटकात पार करत पाक संघाचा 9 विकेटने दारूण पराभव केला.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेवर दहा विकेट्स राखून मात करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर शनिवारच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचं आव्हान मोडून काढत भारतासमोर कडवं आव्हान उभे केलं होते. साखळी फेरीत एकही सामना न हरता पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती. साखळी सामन्यात पाक संघाने भारतावर विजय मिळवला होता. त्याचा वचपा काढत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे.