शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताला तीन पदके

By admin | Updated: August 31, 2015 23:59 IST

पहिलवान मोनूने ४६ किलो फ्री स्टाईलमध्ये आज कांस्यपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या नावावर जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण

सराजिवो (बोस्निया) : पहिलवान मोनूने ४६ किलो फ्री स्टाईलमध्ये आज कांस्यपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या नावावर जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यसह तीन पदके झाली आहेत.भारत पुरुषांच्या फ्री स्टाईल कुस्तीत ३७ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला. त्याआधी अनिल (सुवर्ण) आणि अंकुश (रौप्य) यांनी पदके जिंकली होती. कास्यपदकाच्या प्लेआॅफ लढतीत आज मोनूने अझरबैजानच्या असगर मामादियेवला ४-२ आणि उझबेकिस्तानच्या रुस्तमाबेक जुराएवला २-१ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तो ग्रीसच्या पिलिदिस जॉर्जियोसकडून २-४ असा पराभूत झाला. कास्यपदकाच्या लढतीत त्याने बेलारूसच्या दमित्री यार्मप्लचिकचा ११-० असा धुव्वा उडवला.कास्यपदक जिंकल्यानंतर मोनू म्हणाला, ‘उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सर्व सामने जिंकल्यानंतर मला सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास होता; परंतु उपांत्य फेरीत २ गुणांनी पराभूत होणे निराशाजनक ठरले. मी कास्यपदकासाठीच्या एकतर्फी लढतीत विजय मिळवला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने माझा आत्मविश्वास कमी झाला होता; परंतु प्रशिक्षकांनी जिंकण्यासाठी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे मी जिंकू शकलो. त्यामुळे मी त्यांचे आभार मानू इच्छितो.’ स्पर्धेच्या १०० किलो वजनी गटात भारताच्या नासिर हुसैन उपांत्य फेरीत पोहोचला; परंतु त्याला तुर्कीच्या याकूप येरलिकाया याच्याकडून १२-२ असा पराभव पत्करावा लागला. भारत अजून एका कास्यपदकापासून वंचित राहिला.