शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

स्पेनशी बरोबरी करून भारताने खाते उघडले

By admin | Updated: June 6, 2014 09:19 IST

विश्वकप हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अखेर गुणांचे खाते उघडण्यात यशस्वी ठरला. भारताने गुरुवारी स्पेनविरुद्धची लढत 1-1ने बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले.

हेग : विश्वकप हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अखेर गुणांचे खाते उघडण्यात यशस्वी ठरला. भारताने गुरुवारी स्पेनविरुद्धची लढत 1-1ने बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. गोलकीपर पी.आर. श्रीजेशने चार वेळा अचूक बचाव करीत भारताला या स्पर्धेत गुणाचे खाते उघडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेनच्या आघाडीच्या फळीने भारतीय गोलक्षेत्रत वारंवार मुसंडी मारली. पण श्रीजेशने अप्रतिम बचाव केल्यामुळे स्पेनचे विजय मिळविण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.  
28व्या मिनिटाला रूपिंदरपाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवीत भारताला प्रथमच आघाडी मिळवून दिली. मध्यांतराला एक मिनिटाचा अवधी शिल्लक असताना रॉक ओलिव्हाने स्पेनला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या सातव्या मिनिटाला स्पेनला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण सेरगी इनरिक्यूच्या ड्रॅग फ्लिकवर श्रीजेशने अप्रतिम बचाव करीत स्पेनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर रूपिंदरपालने दिलेल्या पासवर ललित उपाध्यायला गोल नोंदविण्याची संधी होती, पण त्याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. 17व्या मिनिटाला सॅव्हेडोर पिएराला स्पेनचे खाते उघडण्याची संधी असताना, भारतीय गोलकीपर श्रीजेशने हे आक्रमण परतावून लावले. त्यानंतर स्पेनला मिळालेल्या दुस:या पेनल्टी कॉर्नरवर श्रीजेशने पुन्हा एकदा अप्रतिम बचाव केला. धरमवीर सिंगच्या पासवर मनदीपने स्पेनच्या गोलक्षेत्रत मुसंडी मारली. पण त्याला स्पेनच्या बचावपटूने नियमबाह्य पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे पंचांनी भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. त्यावर रूपिंदरने गोल नोंदवीत भारताचे खाते उघडले. त्यानंतर भारताच्या कमकुवत बचावाचा लाभ घेत ओलिव्हाने मध्यंतरापूर्वीच स्पेनला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या दुस:या सत्रत उभय संघांनी तुल्यबळ खेळ केला, पण त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही.  
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बेल्जियमचा पराभव करीत विश्वकप हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. ऑस्ट्रेलियाने बेल्जियमचा 3-1ने पराभव करीत बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली. याच गटातील अन्य सामन्यात इंग्लंडने मलेशियाचा 2-क्ने पराभव केला.  (वृत्तसंस्था)