शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-फ्रान्स आज लढत

By admin | Updated: August 2, 2015 23:36 IST

गेल्या काही आठवड्यांतील वादविवादानंतर भारतीय हॉकी संघ उद्या फ्रान्सविरुद्धच्या लढतीने आपल्या युरोपियन दौऱ्याची सुरुवात करणार आहे.

ला तोकेट (फ्रान्स) : गेल्या काही आठवड्यांतील वादविवादानंतर भारतीय हॉकी संघ उद्या फ्रान्सविरुद्धच्या लढतीने आपल्या युरोपियन दौऱ्याची सुरुवात करणार आहे.परदेशी प्रशिक्षक नेदरलँडचा पॉल वॉन ऐस यांचा तीन वर्षांचा करार पाच महिन्यांच्या आतच बरखास्त केला गेल्यानंतर येथे पोहोचलेला संघ फ्रान्समध्ये दोन सामने खेळल्यानंतर तीन सामन्यांसाठी स्पेनला रवाना होणार आहे.भारताने नुकत्याच झालेल्या बेल्जियम येथील विश्व लीग सेमीफायनल्समध्ये फ्रान्सला पराभूत केले होते आणि या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानी राहिला होता.ओल्टमन्स यांनी भारतीय संघ यजमानाविरुद्ध गांभीर्याने खेळणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘आम्ही गेल्या सामन्यात फ्रान्सला पराभूत केले आहे; परंतु आम्ही त्यांना सहजपणे घेणार नाही. ते युरो हॉकी चॅम्पिनशिपसाठी तयारी करीत आहेत आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला ते सगळ्याच संधीचा फायदा घेऊ इच्छितात. भारतीय मुलांनीही चांगली सुरुवात केली आहे. त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी व्यूहरचनाही आखली आहे. हा दौरा आम्हाला आमची व्यूहरचना आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आणि खेळाडूंचे कौशल्य अजमावण्यास मदत करील.’सराव सत्रानंतर कर्णधार सरदारसिंह म्हणाला की, ‘फ्रान्सचा संघ चांगला आहे आणि त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. आम्ही त्यांना सहजपणे घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या व्यूहरचनेनुसार खेळणार आहोत. बेल्जियममध्ये गेल्या आठवड्यात त्यांनी त्यांची गती आणि सुरुवातीला गोल करताना आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला होता. या वेळेस असा धक्का देण्याची संधी आम्ही त्यांना देणार नाही आणि चेंडू आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू. काही महत्त्वाच्या खेळाडूंचेही संघात पुनरागमन झाले आहे. ज्यामुळे आमचा डिफेन्स आणि फॉरवर्ड फळी मजबूत होणार आहे. आमच्या संघात काही युवा खेळाडूदेखील आहेत.’ (वृत्तसंस्था)