धर्मशाला : दुस:या लढतीत विजय मिळविणा:या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून, टीम इंडिया वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर शुक्रवारी विंडीजविरुद्ध खेळल्या जाणा:या चौथ्या लढतीत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
मालिकेत उभय संघ 1-1 ने बरोबरीत असून, एचपीसीएच्या स्टेडियमवर उभय संघांना मालिकेत आघाडी मिळविण्याची उत्तम संधी आहे. मालिकेतील पाचवा व अखेरचा सामना 2क् ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. सलामी लढतीत पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाने फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये मालिकेत बरोबरी साधण्याची कामगिरी केली. रवींद्र जडेजा व अमित मिश्र या फिरकीपटूंनी अचूक मारा करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. एचपीसीएच्या खेळपट्टीवर मात्र फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे.
विंडीजच्या वेगवान मा:यापुढे भारतीय फलंदाजांची कसोटी ठरणार आहे. यजमान संघाला जानेवारी 2क्13मध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना अडचण भासली होती. त्या वेळी 79 धावांत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
विराट कोहलीला गवसलेला सूर भारतासाठी जमेची बाजू आहे. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या लढतीत विराटने 62 धावांची खेळी केली होती. कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा कोहलीला अंबाती रायडूनंतर फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय यशस्वी ठरला होता.
मुख्य क्युरेटर सुनील चौहाण यांच्या मते, खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार चार वेगवान गोलंदाजांना संधी देण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे फिरकीपटू अमित मिश्रच्या स्थानी ईशांत शर्माला संधी मिळण्याची शक्यता आहे. चेंडूला अधिक उसळी मिळण्याची शक्यता लक्षात घेता ईशांत या खेळपट्टीवर उपयुक्त ठरू शकतो.
वेगवान गोलंदाजीचे आक्रमण पेलण्यास सज्ज असल्याचे सिद्ध करण्यासाठी ईशांत उत्सुक आहे. पहिल्या दोन सामन्यांत भारताच्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षित वर्चस्व गाजविता आले नाही. मोहम्मद शमीने छाप सोडताना मालिकेत 8 बळी घेतले आहेत. फिरकीपटू अक्षर पटेलची संघात निवड झाली असली, तरी त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
फॉर्मात असलेल्या ड्वेन स्मिथ व मालरेन सॅम्युअल्स यांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान आहे. सॅम्युअल्सने कोची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत 126 धावांची खेळी केली होती. सॅम्युअल्सच्या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने विजय साकारला होता. स्मिथने दुस:या लढतीत 97 धावांची खेळी केली; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. विंडीजचा कर्णधार ड्वेन ब्राव्होला वेगवान गोलंदाजांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. गोलंदाजीमध्ये विंडीज संघाची भिस्त रवी रामपाल व जेरोम टेलर यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. विंडीज संघाकडे केमार रोचला खेळविण्याचा पर्याय आहे. (वृत्तसंस्था)
4धर्मशाला येथील क्रीडाप्रेमींना आयपीएल विशेष प्रेम असल्यामुळे येथे होणा:या भारत-वेस्ट इंडिजमधील चौथ्या वन-डे सामन्यांसाठी प्रेक्षकांमध्ये विशेष उत्साह नाही. हिमाचल प्रदेश क्रिकेट मीडिया व्यवस्थापक मोहित सूद यांनी सांगितले, की सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे लोकांमध्ये क्रिकेटप्रति उत्साह दिसून येत नाही़ या स्टेडियमवर 19 हजार 5क्क् प्रेक्षक क्षमता आहे; मात्र आतार्पयत केवळ 12 हजार तिकिटे विकली गेली आहेत, तसेच येथील लोकांना आयपीएलबद्दल विशेष रुची आह़े त्यामुळे वन-डेकडे फारसे लोक आकर्षित होत नाहीत़