शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शूटआउटमध्ये रशियाकडून भारताचा पराभव...

By admin | Updated: August 8, 2016 03:41 IST

आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघ रिकर्व्ह प्रकारात अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून ४-५ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. ८ : आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघ रिकर्व्ह प्रकारात अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून ४-५ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ४-४ अशी बरोबरी असताना निर्णायक सेटमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले होते. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी, बोम्बायलादेवी या तिघींकडून यावेळी सरस कामगिरी अपेक्षित होती.

मात्र, निर्णायक क्षणी त्या दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याने भारताला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अखेरच्या क्षणी रशियन तिरंदाजाने ९ तर भारतीय तिरंदाजाने ८ गुण नोंदवताच या सेटचा निकाल २५-२३ असा रशियाच्या बाजूने गेला आणि भारत पराभूत झाला. ट्युनिया डॉशीजोर्झी, सेनिया पेरोवा आणि इना स्टेपनोवा यांचा समावेश असलेल्या रशियन संघाने ही लढत ५५-४८, ५२-५३, ५०-५३, ५५-५४, २५-२३ अशी जिंकली.

तत्पूर्वी, कोलंबियाला ५-३ असे हरवून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी, बोम्बायलादेवी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी कोलंबियावर सरशी साधण्यात त्या यशस्वी ठरल्या. पहिल्या तीन सेट नंतर दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत होते, शेवटच्या फेरीत भारताच्या ५२ गुणांना मागे टाकण्यासाठी कोलंबियाला २८ गुणांची आवश्यकता होती, परंतु त्यांच्या कॅरोलिन एगुईरे हिने मोठी चूक केली.