शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

भारत नेदरलँडकडून १-३ ने पराभूत

By admin | Updated: June 21, 2017 00:47 IST

कडव्या संघर्षानंतरही भारताला मंगळवारी हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये वरचे मानांकन असलेल्या नेदरलँडविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला.

लंडन : कडव्या संघर्षानंतरही भारताला मंगळवारी हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये वरचे मानांकन असलेल्या नेदरलँडविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील भारताचा हा पहिला पराभव ठरला. सर्व गोलची नोंद पहिल्या दोन क्वार्टरमध्ये झाली. नेदरलँडतर्फे थियरे ब्रिंकमॅन (दुसरा मिनिट), सँडर बार्ट (१२ वा मिनिट) आणि मायक्रो प्रुइसन (२४ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर भारतातर्फे एकमेव गोल आकाशदीप सिंग याने केला. या पराभवामुळे भारताच्या स्पर्धेतील वाटचालीवर विशेष परिणाम झाला नाही. कारण भारताने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला होता. भारताने यापूर्वी साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले होते. या विजयासह नेदरलँडने ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले. त्यांनी सर्वंच लढतींमध्ये विजय मिळवला. भारताने चारपैकी तीन लढतींमध्ये विजय मिळवला. भारत दुसऱ्या स्थानी आहे. आता गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला मलेशियाच्या, तर नेदरलँडला ‘अ’ गटात चौथ्या स्थानावर असलेल्या चीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. भारताविरुद्धच्या लढतीत नेदरलँडला सुरुवातीपासून विजयासाठी पसंती देण्यात येत होती. भारताने संथ सुरुवात केली, तर नेदरलँडने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. दुसऱ्याच मिनिटाला सरदार सिंगला चेंडूवर नियंत्रण राखता आले नाही आणि ब्रिंकमॅनने संघाला आघाडी मिळवून देण्यात कुठलीच चूक केली नाही. युवा आकाश चिकटेने त्यानंतर सहाव्या मिनिटाला योनस डी गेयुसचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. नेदरलँडने १२ व्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेतली. संघाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे त्यांनी गोलमध्ये रूपांतर केले. प्रत्युत्तर देताना भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. नेदरलँडने २४ व्या मिनिटाला ३-० अशी आघाडी घेतली. प्रुइसनने ब्योर्न कोलरमॅनच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. आकाशदीपच्या शानदार प्रयत्नामुळे भारताने लढतीत पुनरागमन केले. त्याने मैदानी गोल नोंदवला. (वृत्तसंस्था)