ऑनलाइन लोकमत पर्थ, दि. ३० - ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघाने ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ येथे होणार आहे. प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाला केवळ २०० धावाच करता आल्या. भारतीय संघाला ५० षटके पूर्ण खेळता आली नसून भारतीय संघ ४८.१ षटकांतच सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य राहण्ो याने सर्वाधिक ७३ धावा केल्या. शिखर धवन ३८, विराट कोहली ०८, सुरेश रैना ०१, अंबाती रायडू १२, महेंद्र सिंग धोनी १७, स्टूअर्ट बिन्नी ०७, रवींद्र जाडेजा ०५, अक्षर पटेल ०१, मोहित शर्मा नाबाद ०७, मोहम्मद शामी २५ धावांच्या बळावर भारताने सर्वबाद २०० धावा केल्या. भारताने ठेवलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चमकदार झाली नाही. बेल १० धावांवर असताना मोहित शर्माने त्याला पायचित ठरवले. इंग्लंडकडून टेलरने सर्वाधिक ८२ धावा केल्या. रुट ०३, मोर्गन ०२, बोपारा ०४ धावांवर बाद झाले. इंग्लंडचा डाव कोसळला असतानाच बटरने उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले त्याने ६७ धावा करीत संघाला विजयाजवळ आणून ठेवले. अखेरीस इंग्लंडने ७ गडी गमावित भारतावर विजय मिळविला. भारताकडून स्टूअर्ट बिन्नीने ३, मोहित शर्मा २ तर सामी व अक्षर पटेलला प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले.
भारताचा पराभव, इंग्लंड फायनलमध्ये
By admin | Updated: January 30, 2015 17:55 IST