शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मोसमाच्या अखेर भारत अव्वल स्थान पटकावू शकतो - धोनी

By admin | Updated: August 29, 2016 20:40 IST

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ यंदा मायदेशात खेळल्या जाणाºया मालिकांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावू शकतो, असे मत मर्यादित

लोडरहिल (अमेरिका) : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ यंदा मायदेशात खेळल्या जाणाºया मालिकांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावू शकतो, असे मत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचेनेतृत्व करणाºया महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. भारतीय संघ मायदेशत न्यूझीलंड, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांसोबत एकूण १३ कसोटी सामने खेळणार आहे.धोनी म्हणाला,‘कर्णधार कोहलीच्या मार्गदर्शनाखाली संघाला चांगला सूर गवसत आहे. सर्व वेगवान गोलंदाज फिट असल्यामुळे आणि चांगली कामगिरी करीत असल्यामुळे आगामी कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याचेसंकेत मिळत आहेत.’रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-२० आंतररष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला,‘वन-डे व टी-२० मध्ये भारतीय संघ तुल्यबळ आहेच, पण आता कसोटी क्रिकेटमध्येही भारतीय संघवर्चस्व गाजवेल. भारतीय संघात फलंदाजीमध्ये चांगला अनुभव आहे. गेल्या अडीच वर्षात एक-दोन बदल वगळता फलंदाजी क्रम सारखाच आहे. अनुभवातून बरेच काही शिकायला मिळते. त्याचप्रमाणे सर्वच वेगवान गोलंदाज फिट आहेत.त्यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरत आहे. आपल्याकडे १० वेगवान गोलंदाज असूनही चांगली बाब आहे. आता आपण अधिक सामने खेळत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना रोटेट करण्याचा पर्याय आहे.’धोनी पुढे म्हणाला,‘संघाची प्रतिभा व अनुभव आता कामगिरीत दिसत आहे.यंदाच्या मोसमात १३ कसोटी सामने खेळायचे आहेत. सर्वकाही अनुकूल घडले तर सत्राच्या अखेर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहील. पहिल्या व दुसºया स्थानावरील संघांदरम्यान मानांकन गुणांचा मोठा फरक राहील.’दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘दोन्ही सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्ट्यांमध्ये विशेष फरक नव्हता, दुसºया लढतीत अमित मिश्राला खेळविणे आमच्यासाठी फायदेशीर ठरले. त्यामुळे विंडीज संघाला१५० पेक्षा कमी धावसंख्येत रोखण्यात यश आले. याच खेळपट्टीवर विंडीजनेपहिल्या लढतीत २४५ धावा कुटल्या होत्या. ’धोनीने टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या अमेरिकेतील स्थळाची प्रशंसा केली.धोनी म्हणाला,‘हा दौरा यशस्वी ठरला. आम्ही येथे पुन्हा कधीही मालिकाखेळण्यासाठी येऊ शकतो. दुर्दैवाने पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरी लढत रद्दझाली. येथील वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल आहे.’ (वृत्तसंस्था)