शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा स्पेनवर २-० ने विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 03:46 IST

भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपल्या युरोपियन दौऱ्यातील चौथ्या सामन्यात आज येथे यजमान स्पेनचा २-० असा पराभव करीत पुन्हा एकदा विजयाची लय प्राप्त केली आहे.

सँट कुगाट डेल वॉलेस (स्पेन) : भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपल्या युरोपियन दौऱ्यातील चौथ्या सामन्यात आज येथे यजमान स्पेनचा २-० असा पराभव करीत पुन्हा एकदा विजयाची लय प्राप्त केली आहे.फ्रान्सविरुद्ध पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारत युरोपियन दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी स्पेनकडून १-४ गोलने पराभूत झाला होता; परंतु सरदारसिंह याच्या नेतृत्वाखालील संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवताना शानदार पुनरागमन करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रमणदीपसिंहने १७ व्या आणि आकाशदीपसिंहने ३३ व्या मिनिटाला मैदानी गोल करताना भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना भारतीय संघाने आज आक्रमक सुरुवात केली. एस. व्ही. सुनील आणि आकाशदीपने काही चांगल्या चाली रचल्या; परंतु स्पेनच्या गोलरक्षकाने चांगले बचाव केले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये स्पेनला सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु श्रीजेश अभेद्य भिंतीप्रमाणे उभा राहिला आणि त्याने प्रतिस्पर्ध्याला गोल करू दिला नाही. त्यानंतर सुनीलनेदेखील भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला; परंतु संघ त्याचा लाभ घेऊ शकला नाही. भारताला रमणदीपसिंहने १७ व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले. भारताने मध्यंतरास १-० अशी आघाडी घेतली होती. (वृत्तसंस्था)स्पेननेदेखील जोरदार हल्ले केले; परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात कोणतीही उणीव बाकी ठेवली नाही. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघ गोलचे खाते उघडू शकले नाहीत.उत्तरार्धात भारताने खेळ उंचावला आणि त्यांचे चेंडूवरील नियंत्रणही सुरेख होते. भारताला सकारात्मक खेळाचा फायदा तिसऱ्या क्वॉर्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला मिळाला. तेव्हा आकाशदीपने रमणदीपच्या सुरेख पासवर गोल करताना भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली. भारताने त्यानंतर स्पॅनिश बचावफळीला दबावात ठेवले. स्पेनजवळ अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पुनरागमन करण्याची संधी होती. त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु पुन्हा श्रीजेशरूपी भिंत भेदू शकले नाहीत.