शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारताची न्यूझीलंडवर ३-० गोलनी मात

By admin | Updated: July 21, 2015 09:12 IST

हरमनप्रीतसिंगच्या दोन शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष संघाने वाल्वो इंटरनॅशनल अंडर २१ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडचा एकतर्फी लढतीत

बेदा (हॉलंड) : हरमनप्रीतसिंगच्या दोन शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष संघाने वाल्वो इंटरनॅशनल अंडर २१ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडचा एकतर्फी लढतीत ३-० असा धुव्वा उडवला. त्याचबरोबर, भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.भारताने रविवारी झालेल्या या लढतीत न्यूझीलंडवर वर्चस्व राखले. ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने सहाव्या आणि ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर सिमरनजितसिंगने २९व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांना चांगली टक्कर दिली; परंतु भारतीय संघाने सातत्याने आक्रमक व्यूहरचना आखताना किवी संघाला खिळवून ठेवले. या आक्रमक पवित्र्याचा भारताला सहाव्या मिनिटाला फायदा झाला आणि हरमीनप्रीतने पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २९व्या मिनिटाला सिमरनजितने भारतासाठी दुसरा गोल करताना आघाडी दुप्पट केली. उत्तरार्धात मजबूत आघाडी मिळवलेल्या भारताने उत्तरार्धातही दबदबा कायम ठेवला आणि अधिक आक्रमक पवित्रा अवलंबला. भारतीय खेळाडू जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले आणि भारताला ४१व्या मिनिटाला एक आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे पुन्हा एकदा गोलमध्ये रूपांतर करून ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने भारताची आघाडी ३-० अशी वाढवली. त्यानंतर ही आघाडी भारताने अखेरच्या मिनिटापर्यंत कायम ठेवली आणि सलग दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने गेल्या लढतीतही जर्मनीचादेखील ३-० असा धुव्वा उडवला होता. भारताची पुढील लढत मंगळवारी येथे बेल्जियमविरुद्ध होईल.(वृत्तसंस्था)