शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताची फ्रान्सवर २-० गोलनी मात

By admin | Updated: August 4, 2015 22:41 IST

उत्कृष्ट आक्रमण व त्याला मिळालेल्या बचाव फळीच्या सुरेख साथीमुळे भारताने यजमान फ्रान्स संघाला २-० नी नमवून आपल्या युरोप दौऱ्याची धडाक्यात

ले तैक्वेट, फ्रान्स : उत्कृष्ट आक्रमण व त्याला मिळालेल्या बचाव फळीच्या सुरेख साथीमुळे भारताने यजमान फ्रान्स संघाला २-० नी नमवून आपल्या युरोप दौऱ्याची धडाक्यात सुरुवात केली. चिंगलेनसना सिंह, एस. व्ही. सुनील यांनी गोल करून संघाचा विजय साकार केला. सरदारसिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने युरोप दौऱ्याची विजयी सुरवात केली. या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंचे वर्चस्व होते. चिंगलेनसनाने १८व्या मिनिटाला गोल करून भारतीय संघाचे गोल खाते उघडून दिले. फ्रान्सच्या बचाव फळीतील खेळाडूंनी केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवून चिंगलेनसनाने सुरेख गोल केला. भारतीय संघाने जोरदार आक्रमण करून फ्रान्सच्या खेळाडूंवर दबाव निर्माण करण्यात यश मिळविले. सरदारसिंग, एस. के. उथप्पा, दानीश मुज्तबा, देविंदर वाल्मीकी यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण मिळविले. दुसरीकडे सुनील, रमणदीपसिंग व आकाशदीपसिंग यांनी फ्रान्सच्या बचाव फळीतील खेळाडूंना जखडून ठेवले. सामन्याच्या २६व्या मिनिटाला सुनील याने मैदानी गोल करून आघाडी २-० अशी वाढविली. ही आघाडी कायम राखण्यात भारतीय खेळाडूंना यश आले. फ्रान्सने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करण्याचा खूप प्रयत्न केला. काही सुरेख चाली रचून त्यांनी भारतीय गोलजाळ्याच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली. मात्र, बचावफळीतील खेळाडूंनी फ्रान्सचे आक्रमण परतवून लावले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने उत्कृष्ट बचाव केला. चौथ्या क्वार्टरमध्येदेखील फ्रान्सने गोल करण्याची संधी निर्माण केली. दोन्ही वेळा श्रीजेशने त्यांची गोल करण्याची संधी विफल केली. (वृत्तसंस्था)