शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:01 IST

जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे चीन व इंग्लंड संघाचा पराभव करून खळबळ उडवून दिली.

पुणे : भारताच्या मुलांच्या अ संघाने चीनचा, मुलींच्या ब संघाने इंग्लंडचा आणि मुलींच्या अ संघाने यूएईचा पराभव करून जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे चीन व इंग्लंड संघाचा पराभव करून खळबळ उडवून दिली. मुलींच्या ग्रुप १ मध्ये पुण्याच्या तनिष्का दोपांडेने फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध एकेरीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिलेक्टेड टीम मुलांच्या ग्रुप १ मध्ये भारत अ संघाने चीनवर ४-१ गेमने पराभूत केले. दुहेरीत रितूपर्णा बोरा - पारस माथूर जोडीने जिहडिंग - जिआजून लियू जोडीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला. तर तरुण - वरुण त्रिखा जोडीने युफेंग काओ - हाओयिन वांग जोडीवर २१-१९, २१-१८ अशी मात करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एकेरीत तरुणने डिंगबर २१-१२, २१-१५ अशी मात करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर चीनच्या युफेंग काओने वरुणवर १५-२१, २१-१८, २१-१९ अशी मात केली. मात्र, एकेरीतील अखेरच्या लढतीत राजकंवरने वांगवर २१-१६, २१-११ अशी मात करून भारत अ संघाला ४-१ने विजय मिळवून दिला. यानंतर सिलेक्टेड टीममध्ये मुलींच्या ग्रुप -२ मध्ये भारत अ संघाने यूएईवर ५-० गेमने ने मात केली. इतर लढतीत सिलेक्टेड टीम्समध्ये मुलींच्या ग्रुप १ मध्ये फ्रान्सने भारत ब संघावर ४-१ ने मात केली.मला महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर नंबर वन व्हायचय, असे भारतीय ब संघाकडून खेळत असलेल्या पुण्याच्या तनिष्का देशपांडेने लोकमतला सांगितले. सकाळच्या सत्रात फ्रान्सविरूध्द खेळताना थोडे दडपण आले होते. कारन आम्ही दुहेरीमध्ये पराभूत झालो होते. माझ्यासाठी एकेरी जिंकणे म्हत्वाचे होते. विरूध्द संघाच्या खेळाडूच्या चूका हेरून मी ते दडपण झूकारून लावत विजय मिळविला. सायंकाळच्या सत्रात इंग्लंडविरूध्द आम्ही एकेतर्फी विजय नोंदविले.-तनिष्का देशपांडेसंघातील इतर सहकारी खेळाडूंचा सुध्दा खेळ चांगला झाला. सायंकाळच्या सत्रात इंग्लंडविरूध्दचे आव्हान परतावून लावत आम्ही विजय मिळविला, असे शेवटी तनिष्का म्हणाली.पुण्याच्या तनिष्का देशपांडेची शानदार कामगिरीमुलींच्या ग्रुप-१ मध्ये भारत ब संघाने इंग्लंडचे आव्हान ४-१ने परतवून लावले. यात दुहेरीत वेन्नेला श्री कोकांती- अनिशा वसे जोडीने लीह अलेन - मेगन थॉमस जोडीवर २१-१५, २१-११ असा विजय मिळवला. यानंतर तनिष्का देशपांडे-वर्षा वेंकटेश जोडीने नताशा लाडो-अँजेलिना वाँग जोडीवर २१-९, १४-२१, २१-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. एकेरीत तनिष्काने अँजेलिनावर २१-५, २१-११ अशी मात करून भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. वषार्ने लीहचे आव्हान २१-५, २१-११ असे परतवून लावले. एकेरीतील अखेरच्या लढतीत इंग्लंडच्या नताशाने भारताच्या अनिशावर १८-२१, २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018