आशिष जैन,११ व्या विश्वचषकाची साखळी फेरी संपण्याच्या मार्गावर आहे. ब गटात अव्वल स्थानावर असलेला गत चॅम्पियन भारत तसेच अ गटात चौथ्या स्थानावर असलेला बांगला देश यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळला जाईल, हे निश्चित झाले आहे. एकूण चार उपांत्यपूर्व लढतींपैकी ही एकमेव लढत हमखास निश्चित झाली. दोन्ही शेजारी १९ मार्च रोजी मेलबोर्न येथे भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजेपासून एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज होतील. विश्वचषकाचा पहिला उपांत्यपूर्व सामना १८ मार्च रोजी सिडनीत खेळला जाईल. या सामन्यासाठी अ गटातून माजी विजेता श्रीलंका संघ निश्चित झाला असून दुसरा संघ शक्यतो द. आफ्रिका असेल. तिसरा उपांत्यपूर्व सामना २० मार्च रोजी अॅडिलेड येथे होईल. यासाठी अ गटातून यजमान आॅस्ट्रेलिया संघ सज्ज आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी असेल तो पाकिस्तान! चौथा उपांत्यपूर्व सामना अ गटात अव्वल स्थानावर असलेला न्यूझीलंड संघ ब गटात चौथ्या स्थानावर राहणाऱ्या आयर्लंड किंवा विंडीजविरुद्ध खेळेल.
भारत-बांगलादेश उपांत्यपूर्व लढत निश्चित
By admin | Updated: March 14, 2015 00:14 IST