शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी वाद

By admin | Updated: March 8, 2017 01:30 IST

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या क्रिकेट मालिकेत वादग्रस्त प्रसंग येणारच हे जगजाहीर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन कर्णधार

बंगळुरू : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या क्रिकेट मालिकेत वादग्रस्त प्रसंग येणारच हे जगजाहीर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसचा वापर करताना एकप्रकारे चुकीचा आधार घेत असल्याचा आरोप करीत मोठा वाद निर्माण केला. त्यामुळे उभय संघांदरम्यान तणाव वाढला. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७५ धावांनी विजय मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना कोहली म्हणाला, ‘आम्ही डीआरएसचा सातत्याने योग्य वापर करू शकलो नाही, पण आम्ही निर्णय मैदानावरच घेतो. त्यासाठी ड्रेसिंग रूमचा आधार घेत नाही. मी फलंदाजी करीत असताना दोनदा बघितले. त्यांचे खेळाडू वर ड्रेसिंग रूमकडे बघत होते. मी पंचांना त्याची कल्पना दिली. हे थांबवायला हवे, असेही त्यांना सांगितले.’आॅस्ट्रेलियाच्या डावातील २१व्या षटकात ज्यावेळी स्मिथला वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचित केले त्यावेळी पाहुण्या संघाचे खेळाडू डीआरएस घेण्याबाबत साशंक होते. स्मिथ सुरुवातीला नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या सहकाऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी गेला. त्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने बघायला लागल्यामुळे पंचांनी ताबडतोब स्मिथला थांबविण्याचा प्रयत्न केला. कोहली यात सहभागी झाल्यामुळे वादात आणखी भर पडली.’

कोहली व स्मिथ दरम्यान ‘तू.. तू.. मै.. मै’..भारतीय कर्णधार विराट कोहली आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यादरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मंगळवारी पुन्हा वाद झाला. पाहुण्या संघाच्या कर्णधाराने बाद झाल्यानंतर डीआरएससाठी ड्रेसिंग रूमकडून संकेत मागितल्याने हा वाद झाला.आॅस्ट्रेलियाच्या डावातील २१व्या षटकात स्मिथला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचित केले. त्यावेळी पाहुणा संघाने या निर्णयाविरुद्ध डीआरएसची मागणी करायची किंवा नाही, याबाबत साशंकता होती. कारण सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरच्या निर्णयाविरुद्ध डीआरएसचा वापर करण्यात आला होता. तो निर्णय भारताच्या बाजूने लागला होता. स्मिथ सुरुवातीला चर्चा करण्यासाठी नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या सहकाऱ्याकडे गेला. पण, फलंदाज ड्रेसिंग रूमकडे बघत असल्याचे पंचांच्या निदर्शनास आले. पंचांनी स्मिथला थांबविण्याचा प्रयत्न केला.