शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भालाफेकपटू नीरजसाठी भारताने मागितले 'वाईल्ड कार्ड'

By admin | Updated: July 28, 2016 19:01 IST

२० वर्षांखालील गटाचा विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टवाईल्ड कार्डटद्वारे रिओ आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश देण्याची मागणी एएफआय आयएएएफ केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २८ : २० वर्षांखालील गटाचा विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टवाईल्ड कार्डटद्वारे रिओ आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश देण्याची मागणी भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय)आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्समहासंघाकडे(आयएएएफ) केली आहे. एएफआयने यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख सॅबेस्टियन को यांनापत्र लिहिले आहे. त्यात नीरजला रिओमध्ये ५आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये भालाफेकीत वाईल्ड कार्डने थेट प्रवेश देण्याची मागणी केली.

हरियाणाचा १८ वर्षांचा नीरज याने पोलंडमध्ये २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भालाफेक करीत विश्व विक्रमाची नोंद केली होती. लॅटेव्हियाचा जिगिरमंड सिरमायस याचा ८४.६९ मीटरचा विक्रम नीरजने मोडित काढला. नीरजचा क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कालच सन्मान केला.

त्याला क्रीडा मंत्रालयाकडून दहा लाखांची रोख रक्कमदेखील भेट दिली. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याची अखेरची तारीख ११ जुलै होती. नीरज निर्धारित वेळेत पात्रता गाठू शकला नव्हता. आॅलिम्पिक भालाफेकीत पात्रता अंतर ८३ मीटर असे होते. नीरजचे वय फारच कमी असल्याने आणि सध्या तो सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकूशकतो, या भावनेतून भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने त्याच्यासाठी वाईल्ड कार्डची मागणी पुढे रेटली.

एएफआयचे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय महासंघाचे सदस्य आदील सुमारीवाला यांनीदेखील विश्व संस्थेने मनावर घेतल्यास नीरजला रिओसाठी वाईल्ड कार्ड मिळण्यास अडचण जाणार नसल्याचे सांगितले. आॅलिम्पिकमध्ये जगातीलसर्वोत्कृष्ट खेळाडू स्वत:ला पारखतात. नीरजने अलीकडच्या कामगिरीवरून स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे. भारताच्या या खेळाडूला विश्व संस्थेने वाईल्ड कार्ड द्यावे, असे भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेने पत्रात आवाहन केले.