शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SL Live : श्रीलंका विजयाच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: June 8, 2017 22:40 IST

शतकी भागीदारीनंतर गुणतिलका आणि मेंडिस ठरावीक अंतराने बाद झाल्याने लढत रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 8 - धनुष्का गुणतिलका आणि कुशल मेंडिस यांनी जबरदस्त शतकी भागीदारी करत मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीकंलेला लढतीत पुनरागमन करून दिले आहे. मात्र गुणतिलका आणि मेंडिस ठरावीक अंतराने धावचीत  झाल्यानंतर कर्णधान अँजेलो मॅथ्युजने एक बाजू लावून धरत लंकेला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे. तत्पूर्वी भारताने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला. श्रीलंकेचा सलामीवीर निरोशन डिकवेला याला भुवनेश्वर कुमारने तंबूची वाट दाखवत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र गुणतिलका (76) आणि मेंडिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी करत लंकेला सामन्यात पुनरागमन करून दिले. शिखर धवनचे संयमी शतक आणि रोहित-धोनीच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर भारताने ५० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात धावा 321 करत लंकेपुढे विजयासाठी 322 धावांचे आव्हान ठेवले. धवनने १२५ धावांची संयमी शतकी खेळी केली. रोहित शर्माने 78 तर धोनीने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. हाणामारीच्या शेवटच्या षटकात केदार जाधवने लंकेची गोलंदाजी पोडून काढली. केदारने शेवटच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावत १५ धावा वसूल केल्या. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीत चौथ्यांदा शतकी भागिदारी करत भारताला अश्वासक सुरुवात करुन दिली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याप्रमाणे रोहित-धवनने सावध सुरुवात करत श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी मलिंगाने तोडत श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. मलिंगाने रोहित शर्माला ७८ धावांवर परेराकरवी झेलबाद केले. रोहितने 79 चेंडूचा सामना करताना ७८ धावा केल्या. यामध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. संथ सुरुवात करणाऱ्या रोहितने लंकाच्या गोलांदाजीची पिसे काढली. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला कर्णधार विराट कोहलीही लगेच बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. रोहित-धवनने 24.5 षटकांत १३८ धावांची भागिदारी केली. मागील सामन्याप्रमाणेच रोहित आणि शिखर प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघ मोठी धावसंख्या रचण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेला युवराजही फार काळ तग धरु शकला नाही. सात धावांवर तो बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर भारताच्या तीन विकेट झटपट गेल्या. त्यामुळे धावसंख्या काहीशी संथ झाली होती. पण धवनने आपला संयमी फलंदाजी करताना शतक ठोकले. धोनीनेही आक्रमक फटके मारत धावसंख्या वाढवली. धवनने आपल्या शतकी खेळीदरम्यान १३ चौकार लगावले. शतक झळकावल्यानंतर धवनने आक्रमक रुप घेत गोलंदाजांची धुलाई केली. 125 धावसंखेवर त्याला मलिगांने बाद केले. धवननंतर मैदानात आलेल्या पंड्याने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. पहिला षटकार लगावल्यानंतर दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो 9 धावांवर झेलबाद झाला. धोनीने एका बाजूने आपला मोर्चा संभाळत अर्धशतक केले. आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावला. धोनीने ५२ चेंडूत ६३ धावांवर तो बाद झाला. जाधवने १३ चेंडूत नाबाद 25 धावांची खेळी केली. लंकेकडून मलिंगाने सर्वाधिक दोन बळी घेतले आहेत. 

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाची शक्यता असल्याने श्रीलंकेने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या सामन्यात पाकिस्ताननेदेखील पावसाचा मुद्दा लक्षात घेऊन भारताला प्रथम फलंदाजी दिली होती. मात्र भारताने 319 धावांचा पाऊस पाडत पाकिस्तानची धुलाई केली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे लक्ष लागले आहे.

भारत या सामन्यात उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. तर श्रीलंकेच्या संघाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. श्रीलंकेसाठी ‘करो वा मरो’ अशी स्थिती युवा खेळाडूंचा कस लागणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करणारा भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात असल्याने श्रीलंकेसमोरील आव्हान अतिशय अवघड आहे.

भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नसून पाकिस्तानविरुद्धचा विजयी संघ कायम आहे. तर श्रीलंकेच्या संघात अँजलो मॅथ्युज आणि थिसारा परेरा यांचे पुनरागमन झाले आहे. मॅथ्यूज परतल्यामुळे लंकेच्या मधल्या फळीला बळ मिळाले आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात मॅथ्यूजने ९५ धावा केल्या होत्या. गोलंदाजी मात्र लंकेची कमकुवत बाजू आहे. लसिथ मलिंगावर हा संघ विसंबून असून सुरंगा लखमल, नुवान प्रदीप आणि असेला गुणरत्ने हे तितके प्रभावी वाटत नाहीत. अष्टपैलू तिसारा परेरा याला भारताविरुद्ध स्थान मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटू सीकुगे प्रसन्ना हा देखील प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरला.