शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुलपदक विजेत्यांच्या बक्षिसात घसघशीत वाढ

By admin | Updated: August 12, 2014 01:14 IST

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत राज्य शासनाने घसघशीत वाढ केली असून, या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे

मुंबई : राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत राज्य शासनाने घसघशीत वाढ केली असून, या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. खेळाडूंसोबत त्यांच्या प्रशिक्षकांच्या बक्षिसांच्या रकमेतही राज्य सरकारने भरीव वाढ केली आहे.राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातील खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली. सुवर्णपदक विजेत्यांना आता १० लाखांऐवजी ५० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला ७.५ लाखांऐवजी ३० लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्यास ५ लाखांऐवजी २० लाख रुपये मिळणार आहेत. खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांच्या बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रशिक्षकांना अनुक्र मे अडीच लाखाऐवजी १२.५ लाख, १ लाख ८७ हजार ५०० रुपयांऐवजी ७.५ लाख आणि १.२५ लाखाऐवजी ५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. राही सरनोबत (नेमबाजीत सुवर्णपदक), अयोनिका पॉल (नेमबाजीत रौप्यपदक), गणेश माळी, ओम्कार ओतारी व चंद्रकांत माळी (भारोत्तोलनात कांस्यपदक) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शासकीय सेवेत विविध पदांवर सामावून घेण्यात येणार आहे. नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतर पदक विजेत्यांनाही याप्रमाणे शासकीय सेवेत घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)