शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भालाफेकपटू अनुरानीचे शानदार रौप्य यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 03:52 IST

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पारुलने जिंकले कांस्य

दोहा : भालाफेकपटू अनुरानीने आशियाई अ‍ॅथलेटिक्सच्या पहिल्या दिवशी तिरंगा फडकावित रौप्य पदक पटकावले. तसेच ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पारुल चौधरीने भारतासाठी कांस्य पदक जिंकले.दुती चंदने १०० मीटर शर्यतीत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडताना उपांत्य फेरीत स्थान मिळवले. मात्र, ४०० मीटर शर्यतीत स्टार धावपटू हिमा दास पाठीच्या दुखापतीमुळे शर्यत पूर्ण करु शकली नसल्याने भारताच्या पदरी निराशा आली. २६ वर्षीय अनुने ६०.२२ मीटरची भालाफेक करत रौप्य यश मिळवले. चीनच्या लियू हुइहुइ हिने सुवर्ण पदक जिंकताना ६५.८३ मीटर भाला फेकला. याच स्पर्धेतील अन्य भारतीय शर्मिला कुमारी (५४.४८ मीटर) सातव्य स्थानी राहिली.दुसरीकडे, ५ हजार मीटर शर्यतीत २४ वर्षीय पारुलने १५ मिनिट ३६.०३ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक पटकावले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीही ठरली. अन्य भारतीय धावपटू संजीवनी जाधवने १५ मिनिट ४१.१२ सेकंदासह चौथ्या स्थानी समाधान मानले. मुतिली विंफ्रेड यावी (१५:२८.८७) आणि बोंतु रेबितू (१५:२९.६०) या बहारीनच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. त्याचप्रमाणे, सरिताबेन गायकवाड आणि एम. अर्पिता यांनी महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत, तर एम. पी. जाबिर याने पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली.याआधी दुती चंदने ११.२८ सेकंद वेळेची नोंद करीत महिलांच्या १०० मीटर चौथी हिट जिंकली. तिने ११.२९ सेकंद वेळेचा आपला राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम तिने गेल्या वर्षी गुवाहाटीमध्ये नोंदवला होता. तिला विश्वचॅम्पियनशिप पात्रता निकष ११.२४ सेकंद वेळेची नोंद करता आली नाही. जिन्सन जॉन्सन (८०० मी.), मोहम्मद अनस व राजीव अरोकिया (४०० मी.), प्रवीण चित्रवेल (तिहेरी उडी), गौतमी एम (१५०० मी.) यांनी आगेकूच केली. (वृत्तसंस्था)महाराष्ट्राच्या अविनाशचा पराक्रम..अखेरच्या फेरीमध्ये चौथ्या स्थानावर असताना मोक्याच्यावेळी कमालीचा वेग वाढवलेल्या अविनाश साबळेने ३ हजार स्टिपलचेज स्पर्धेत रौप्य जिंकले. पुणेकर अविनाशने भारतासाठी पदकाची कमाई करताना ८ मिनिटे ३०.१९ सेकंदाची वेळ नोंदवली. पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत अविनाशने सुवर्ण जिंकताना राष्ट्रीय विक्रम रचत ८:२८.९४ सेकंदाची वेळ नोंदवून त्याने आशियाई स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.