शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

जलतरणाची ‘राणी’ म्हणून छाप पाडण्याचा इम्माचा निर्धार

By admin | Updated: August 3, 2016 04:16 IST

आॅस्ट्रेलियाची उदयोन्मुख जलतरणपटू इम्मा मॅककियोन रिओ आॅलिम्पिकमध्ये जलतरणामध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे.

रिओ : आॅस्ट्रेलियाची उदयोन्मुख जलतरणपटू इम्मा मॅककियोन रिओ आॅलिम्पिकमध्ये जलतरणामध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे. इम्माचे आई-वडील जलतरणपटू असून त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. वडील रॉन यांनी १९८० व १९८४ मध्ये आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. ते मुलगी इम्माचे प्रशिक्षक आहे. इम्माचा भाऊ डेव्हिड आॅस्ट्रेलियाच्या आॅलिम्पिक पथकात आहे. त्यामुळे रिओ आॅलिम्पिक त्यांच्यासाठी कौटुंबिक स्पर्धा झालेली आहे. इम्मा रिओमध्ये २०० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर बटरफ्लाय, चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले, चार बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले आणि चार बाय १०० मीटर मिडले रिलेमध्ये सहभागी होणार आहे. अनेक टेनिसपटूंची माघारदिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर, मिलोस राओनिच, टॉमस बर्डिच, सिमोना हालेप आणि व्हिक्टोरिया अजारेंक यांच्यासह अनेक दिग्गज टेनिसपटूंनी यावेळी रिओ आॅलिम्पिकमधून माघार घेतली आहे. नोव्हाक जोकोव्हिच, अ‍ॅन्डी मरे, राफेल नदाल आणि सेरेना विलियम्सन यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश असला तरी टेनिसला आॅलिम्पिकमध्ये कायम ठेवावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही खेळाडूंनी दुखापतीमुळे तर काही खेळाडूंनी झिका व्हायरसमुळे आॅलिम्पिकमधून माघार घेतली आहे. त्यात सर्वांत दिग्गज खेळाडू १७ वेळा ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररचे नाव आहे. या व्यतिरिक्त पुरुष विभागात अव्वल २० मध्ये समावेश असलेल्या व माघार घेणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये राओनिच, बर्डिच, डोमिनिक थीम, रिचर्ड गास्केट, जॉन इस्नर, फेलिसियानो लोपेज आणि निक किर्गियोस यांचा समावेश आहे. महिला विभागात माघार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आॅस्ट्रेलियन उपविजेती डोमिनिका सिबुलकोव्हा, हालेप, अजारेंका, बेलिंडा बेनसिच आणि कॅरोलिना पिलिसकोव्हा यांचा समावेश आहे. डोपिंगच्या कारणामुळे शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी आहे. त्यामुळे तिला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. सौदी अरबच्या चार महिला खेळाडू सहभागी होणारलंडन आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवत इतिहास घडविणाऱ्या सौदी अरबची महिला धावपटू सराह अल अतार यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. या व्यतिरिक्त तिच्या देशाच्या अन्य तीन महिला खेळाडू यावेळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. अतार लंडन आॅलिम्पिकमध्ये डोक्यापासून पायापर्यत (बुरखा) पोशाख परिधान करीत ८०० मीटर दौड स्पर्धेत सहभागी झाली होती. ती सौदी अरबची पहिली महिला आॅलिम्पियन ठरली होती. अतारला त्यावेळी हिटमध्ये सर्वांत अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तिने तिच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत अर्धा मिनिट उशिरा शर्यत पूर्ण केली होती. प्रेक्षकांनी उभे राहून तिला मानवंदना दिली होती. यावेळी अतार व्यतिरिक्त सौदी अरबच्या ज्या अन्य महिला खेळाडू आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत त्यात ज्युडोमध्ये वुजुम फाहमी, तलवारबाजीमध्ये लुबना अल ओमर आणि १०० मीटर दौड स्पर्धेत करिमान अबू अल जदैल यांचा समावेश आहे.बरमुडा, समोओपेक्षा पाकचे पथक लहानकराची : पाकिस्तानने क्रिकेट व हॉकीमध्ये विश्वपातळीवर छाप सोडली असली असली तरी रिओ आॅलिम्पिकमध्ये मात्र त्यांचे केवळ सात खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे. पाकिस्तानचे पथक समोआ, पापुआ न्यूगिनी आणि बरमुडा यांच्यासारख्या लहान बेटांच्या तुलनेतही छोटे आहे. पाकिस्तानचा हॉकी संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)>जगभरातील २०६ देशांच्या खेळाडूंचे लक्ष्य रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे असेल,पण नेहमीप्रमाणे सुवर्णपदकामध्ये यावेळीही सोन्याच्या तुलनेच चांदीचे प्रमाण अधिक आहे. सीएनएनच्या अहवालानुसार आॅलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पदकामध्ये ४९४ ग्रॅम चांदी आणि केवळ ६ ग्रॅम सोने राहील. बाजारामध्ये याचे मूल्य ५८७ डॉलर्स (जवळजवळ ३९ हजार रुपये) आहे. आॅलिम्पिकमध्ये शुद्ध सोन्याचे अखेरचे सुवर्णपदक १९१२ मध्ये स्टॉकहोम आॅलिम्पिकदरम्यान देण्यात आले होते. ब्राझीलने रिओ आॅलिम्पिकसाठी पाच हजारपेक्षा अधिक पदके तयार केली आहे. त्यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे.