डब्लिन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची भ्रष्टाचारविरोध आणि सुरक्षा समिती (एसीएसयू) अफगाणिस्तान आणि हाँगकाँगदम्यान डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या विश्वकप क्वॉलिफायर लढतीची चौकशी करणार आहे.स्वीडनच्या राजधानीत मंगळवारी झालेल्या या सामन्यात काही ‘असामान्य’ बाबी पाहण्यात आल्या आणि त्यावर शंका उपस्थित करण्यात आली आहे. एसीएसयूलादेखील या सामन्यात सट्टेबाजी आणि फिक्सिंग झाल्याची शंका आहे.सामन्यादरम्यान खेळाडूंना ‘असामान्य’ बाबी करताना पाहण्यात आले आहे आणि एसीएसयूला अनेक प्रमुख सट्टेबाजांच्या फर्मसोबत संपर्कात होते अशी शंका असल्याचा दावा क्रिकइन्फो वेबसाईटवरील एका रिपोर्टमध्ये केला आहे.हाँगकाँगने या लढतीत पाच विकेटस्ने विजय मिळवला होता. त्यामुळे हा संघ २0१६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२0 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरला. ही स्पर्धा पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान होणार आहे. पराभवानंतरही अफगाणिस्तानला स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी अजून बाकी आहे. त्यांची तिसऱ्या क्वालीफाइंगमध्ये पापुआ न्यू गिनीशी गुरुवारी लढत होणार आहे. (वृत्तसंस्था)
आयसीसी ‘त्या’ सामन्याची चौकशी करणार
By admin | Updated: July 23, 2015 23:01 IST