शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसीला समांतर संघटनेची ब्ल्यू प्रिंट

By admin | Updated: August 11, 2015 00:42 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) समांतर अशा संघटनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून, या संघटनेची नाळ आॅलिम्पिकसोबत जोडण्याची योजना असल्याचा गौप्यस्पोट

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) समांतर अशा संघटनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून, या संघटनेची नाळ आॅलिम्पिकसोबत जोडण्याची योजना असल्याचा गौप्यस्पोट आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांनी केला आहे. ही संघटना म्हणजे जगातील क्रिकेटचे भविष्य असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी समांतर संघटनेचे वृत्त देताना क्रिकेटविश्वाचे लक्ष पुन्हा एकदा आपल्याकडे वेधले आहे. मोदी यांच्या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले मोदी सध्या लंडनमध्ये आहेत. समांतर संघटनेला आॅलिम्पिकची मान्यता राहणार असून, ही संस्था कसोटी आणि टी-२० क्रिकेटचे संचालन करणार आहे. वन-डे क्रिकेट प्रारूप रद्द करण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले. ललित मोदी म्हणाले, ‘आम्ही वेगळ्या क्रिकेट संघटनेबाबत चर्चा करीत असून, त्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. समांतर संघटना स्थापन करण्याच्या कार्यात माझा सक्रिय सहभाग असून, ब्ल्यू प्रिंट तयार करण्याच्या कार्यात माझा सहभाग होता. मी प्रथमच हे जाहीरपणे सांगत आहे. या संघटनेला विद्यमान संघटनेचे आव्हान पेलावे लागू शकते. सध्या संघटनेचे कुणीच सदस्य नाही. त्यासाठी काही अरब डॉलर्सची गरज भासेल आणि काम सुरू करण्यासाठी ही राशी मिळविण्यास मोठी अडचण भासेल, असे मला वाटत नाही.’ ललित मोदी पुढे म्हणाले, ‘मी आखलेली योजना व्यापक आहे. घाईघाईत ही योजना आखलेली नसून त्यासाठी अनेक वर्षे लागली.’ वर्ष २०१०मध्ये आयपीएलच्या आयुक्त पदावरून बर्खास्त करण्यात आलेल्या ललित मोदी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या केसमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट निघालेला आहे. मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या आयसीसीने काही सकारात्मक पाऊल उचलले तरच माजी योजना अपयशी ठरेल, असे मोदी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)