शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसीकडून भारतीय संघाला 10 लाख डॉलरचे बक्षीस

By admin | Updated: March 28, 2017 14:27 IST

धरमशाला कसोटीत भारतीय संघाने कांगारुंना लोळवत 10 लाख डॉलरचे बक्षीसावर नाव कोरले आहे. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षीस देण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - धरमशाला कसोटीत भारतीय संघाने कांगारुंना लोळवतं 10 लाख डॉलरच्या बक्षिसावर नाव कोरले आहे. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षीस देण्यात आले आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी 1 एप्रिल 2017 ही अंतिम मुदत आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर भारताचे क्रमांक वनचे स्थान अधिक बळकट झाले आहे. 10 लाख डॉलर म्हणजे जवळजवळ 65 कोटींची कमाई भारताने 2016-17 च्या सत्रात केली आहे. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, 2015 पासून ही रक्कम 10 लाख डॉलर इतकी करण्यात आली.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने मागितली माफी 
कोणी डिवचले तर, उत्तर देणारच - विराट कोहली 
'अजिंक्य'ने राखली मुंबईची शान 
पहिल्या कसोटीत अजिंक्य असणारा रहाणे नववा कर्णधार 
85 वर्षाच्या भारतीय क्रिकेट विश्वातील विराटसेनेचा ऐतिहासिक विक्रम
 
2016-17 च्या मोसमात भारतीय संघ तूफान फॉर्ममध्ये आहे. भारताने या मोसमात एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करीत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले होते. भारताने न्यूझीलंडला 3-0 आणि इंग्लंडला 4-0 ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने 208 धावांनी विजय मिळवला होता. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीनंतर भारताचा एकही कसोटी पराभव झालेला नाही हे विशेष.ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळाल्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. तर भारताच्या खात्यात 14 गुणांचा फायदा झाला आहे.

आयसीसी क्रमवारी -

  1. भारत - 122
  2. ऑस्ट्रेलिया - 108
  3. दक्षिण आफ्रिका - 107
  4. इंग्लंड - 101
  5. न्यूझीलंड - 98
  6. पाकिस्तान - 97
  7. श्रीलंका - 90
  8. वेस्ट इंडिज - 69