शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डीआरएस विवादाकडे आयसीसीचा कानाडोळा! नाही होणार कारवाई

By admin | Updated: March 8, 2017 21:38 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल आटोपलेल्या बंगळुरू कसोटीनंतर सुरू झालेला डीआरएस विवादाप्रकरणी आज आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

दुबई, दि. 8 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल आटोपलेल्या बंगळुरू कसोटीनंतर सुरू झालेला डीआरएस विवादाप्रकरणी आज आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या वादाकडे कानाडोळा करत आयसीसीने या प्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांच्यापैकी कुणावरही कारवाई होणार नसल्याचे आज सांगितले. त्यामुळे कालपासून दोन्ही संघ आणि आजी-माजी क्रिकेटपटूंकडून पेटवण्यात आलेला डीआरएस विवाद आता थांबण्याची शक्यता आहे.  

मंगळवारी आटोपलेल्या बंगळुरू कसोटीत कोणत्याही खेळाडूकडून आयसीसी कोड ऑफ कंडक्टचा भंग झालेला नाही. त्यामुळे सामन्यादरम्यान  मैदानात घडलेल्या दोन्ही घटनांचा विचार करून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ पायचीत झाल्यानंतर त्याने या निर्णयाबाबत ड्रेसिंग रूमच्या दिशेने खाणाखुणा करून मत मागविले होते. पण स्मिथची ही चतुराई लक्षात आल्यावर विराट कोहलीने त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. दरम्यान, पंचांनी मध्यस्ती करत स्मिथला तंबूत परतण्याचा इशारा केला होता. त्यानंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन संघाविरोधात आयसीसीकडे लेखी तक्रार केली होती. "आम्ही व्हिडीओ पाहिला आहे. ज्यात स्टिव्ह स्मिथ जाणूनबुजून ड्रेसिंग रुमकडे इशारा करत सल्ला मागतो आहे. त्यामुळे आम्ही खंबीरपणे कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियासोबत उभे आहोत. विराट कोहली हा एक परिपक्व आणि अनुभवी क्रिकेटर आहे. मैदानावरील त्यांची वागणूक ही दुस-यांसाठी उदाहरण आहे." असे बीसीसीआयने म्हटले होते.   त्यावेळी विराटच्या प्रतिक्रियेला मैदानावरील पंच निजल लाँग यांनी समर्थन दिलं होतं आणि ते स्मिथला रोखण्यासाठी त्याच्याजवळ गेले होते. बीसीसीआयनं आयसीसीकडेही यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात असे वाद नेहमीच होत असतात. यापूर्वी 2008च्या मालिकेमध्येही मंकीगेटवरून असाच वाद झाला होता.