शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ICC Champions Trophy: भारत-पाक सामन्यात सट्टेबाजांची भारताला पसंती, तब्बल 400 कोटींचा सट्टा

By admin | Updated: June 4, 2017 08:20 IST

संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागून असलेल्या कट्टरप्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाजार तेजीत

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 4 -  संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागून असलेल्या कट्टरप्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानदरम्यान महाप्रतिष्ठेचा सामना आज होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसोबतच सट्टाबाजाराचे या सामन्याकडे विशेष लक्ष आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाजार तेजीत आहे. या सामन्यात तब्बल 400 कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
 
 गतविजेता भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सलामीला आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे, या सामन्यावर 400 कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सट्टेबाजांकनी या सामन्यात भारत विजयाचा दावेदार असल्याचं म्हटलं आहे.  भारतावर 50 पैशांचा सट्टा लावण्यात येत आहे. म्हणजेच भारतावर एक रुपया लावला आणि भारत जिंकला, तर 1 रुपया 50 पैसे मिळणार ,तर पाकिस्तानवर 2 रुपयांचा सट्टा लावण्यात येत आहे. म्हणजे पाकिस्तानवर जर 1 रुपया लावला आणि पाकिस्तान जिंकला तर 3 रुपये मिळणार आहेत.
 
मात्र, या  सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.  हवामान खात्याने दिलेल्या ही माहिती दोन्ही देशांतील कोट्यवधी चाहत्यांसाठी निराशाजनक आहे. आज, रविवारी सामन्याच्या सकाळच्या सत्रात आणि दुपारी पाऊस कोसळू शकतो. हवामान खात्याच्या अन्य वेबसाईटस्नुसार मात्र पावसाची शक्यता 70 टक्के इतकी आहे. तथापि, इंग्लंडमध्ये सध्याच्या वातावरणात पाऊस कधी धो-धो कोसळतो, तर कधी ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा असतो. अनेकदा 10 मिनिटे पाऊस आल्यानंतर दिवसभर कधीही त्रास होत नाही. शुक्रवारी अधूनमधून झालेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीवर पाणी फेरले गेले. अखेर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले होते.
हा सामना म्हणजे पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यातील ‘जंग’ मानली जात आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पाकचे गोलंदाज विरुद्ध भारतीय फलंदाज अशीच ही लढत आहे. कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनी या फलंदाजांपुढे पाकचे आमिर आणि जुनैद खान यांच्यासारखे गोलंदाज आहेत. 
 भारतासाठी गोलंदाजी संतुलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे सर्वच गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाजीला खिंडार पाहू शकतात. भारत-पाक सामना असेल तर तो इतर सामन्यांच्या तुलनेत वेगळा मानला जातो. सामन्याचा प्रभाव राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरदेखील दिसून येतो. क्रिकेटपटू सामना खेळत असले तरी दोन्ही देशांतील चाहत्यांना पराभव कधीही पचनी पडत नाही. 
 पाकला कसे हरवायचे हे विराटला चांगले ठाऊक आहे. पण, त्याच्या परिपक्वपणाची ही कसोटी असेल. कोच कुंबळेसोबतच्या मतभेदाचे वृत्त ऐन सामन्याच्या पूर्वसंध्येला बाहेर आले. अशावेळी मैदानाबाहेरील वाद विसरुन स्पर्धा जिंकण्याचे संघापुढे आव्हान असेल. 
 दुसरीकडे पाक संघदेखील वादविवादाला अपवाद नाही. स्पर्धेआधीच उमर अकमल याला खराब फिटनेसमुळे मायदेशी परत पाठविण्यात आले. चॅम्पियन्समध्ये भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड २-१ असा आहे. उद्याच्या लढतीत मात्र टीम इंडियाचे पारडे प्रत्येक बाबतीत जड वाटते. फलंदाजीत रोहित सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून, शिखर धवन २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. आजारी युवराजचे खेळणे निश्चित नाही. दिनेश कार्तिक त्याचे स्थान घेऊ शकतो. 
उभय संघ यातून निवडणार-
भारत-
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन.
पाकिस्तान-
पाकिस्तान : सरफराज अहमद (कर्णधार) अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आझम, फहीम अशरफ, फखार जमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीज, शादाब खान, शोएब मलिक, वहाब रियाज.