शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

... तर मी धोनीच्या घरापुढे आंदोलन केले असते : गावसकर

By admin | Updated: January 6, 2017 00:55 IST

महेंद्रसिंग धोनी याने वन-डे आणि टी-२० मधून निवृत्त होण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मी आनंदीत आहे.

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी याने वन-डे आणि टी-२० मधून निवृत्त होण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मी आनंदीत आहे. पण त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असता तर पुनरागमनासाठी त्याच्या घरापुढे आंदोलनाला बसणारा मी पहिला व्यक्ती असतो, असे वक्तव्य क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी केले आहे. झारखंडचा हा यष्टिरक्षक-फलंदाज संघात आणखी काही काळ चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो, असे गावसकर यांना वाटते.ते म्हणाले, महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून निवृत्ती जाहीर केली तरी एक खेळाडू म्हणून तो जबरदस्त आहे. तो एका षटकात मॅचचे भविष्य बदलून टाकतो. भारताला एका खेळाडूच्या रूपात त्याची गरज आहे. खेळाडू म्हणून संघात राहण्याचा त्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.’धोनी कर्णधार नसल्याने यापुढे त्याच्यावर आता दडपण राहणार नाही. त्याची फलंदाजी तसेच यष्टिरक्षण आणखी बहरणार आहे. कोहली त्याला चौथ्या अथवा पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवेल, अशी मला आशा आहे. या स्थानाखाली धोनीला फलंदाजीसाठी पाठविल्यास अर्थ उरणार नाही. धोनी उत्कृष्ट ‘फिनिशर’ असल्याने चौथे किंवा पाचवे स्थान त्याच्यासाठी योग्य ठरेल. धोनी आणि कोहली हे मैदानावर परस्परांना पूरक ठरतील. भारताला यामुळे सामन्यात कामगिरी सुधारण्यास मदत मिळणार आहे.धोनीसाठी यष्टिरक्षण अधिक सोपे होईल, असा विश्वास व्यक्त करीत गावसकर पुढे म्हणाले, ‘गोलंदाजीतील बदल आणि इतर बाबींचा विचार करावा लागणार नसल्याने धोनी मोकळा राहणार आहे. सर्वत्र लक्ष घातल्यामुळे ध्यान विचलित होण्याची भीती असते.’धोनीने नेतृत्व सोडल्याबद्दल गावसकर यांना आश्चर्य वाटले नाही. ते म्हणाले, ‘हा निर्णय अपक्षित होताच. मला वाटले की, धोनी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कर्णधार राहील. भारत सध्या चॅम्पियन आहे. विराटकडे नेतृत्वाची धुरा सोपविली जाऊ शकते. कसोटीत विराटचे यश पाहता विराटकडे वन-डेची धुरा आल्यास आश्चर्य वाटणार नाही.’धोनी २०१९ पर्यंत खेळणे सुरू ठेवेल का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘त्याचे खेळणे इच्छा आणि फॉर्मवर विसंबून असेल. सध्या तरी खूप पर्याय उपलब्ध दिसत नाही. क्रिकेट अखेर अनिश्चिततेचा खेळ आहे. आपल्याला वाटते की धोनीनंतर कुणीही नाही, अशा वेळी कुणी तरी येतो आणि त्याचे स्थान घेतो.’ (वृत्तसंस्था)