शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मी मुलीमध्ये माझे क्रिकेट पाहतो

By admin | Updated: July 4, 2017 01:37 IST

आर्थिक परिस्थितीमुळे मला पुढे उच्चस्तरीय क्रिकेट खेळायला मिळाले नाही याची खंत आहे. आज माझे स्वप्न माझ्या मुलीने पुर्ण

रोहित नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘लहानपणापासून मला क्रिकेटचे वेड आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे मला पुढे उच्चस्तरीय क्रिकेट खेळायला मिळाले नाही याची खंत आहे. आज माझे स्वप्न माझ्या मुलीने पुर्ण केल्याचा आनंद आहे. तीच्यामध्ये आज मी माझे क्रिकेट पाहतोय,’ अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची सलामीवीर पूनम राऊतचे वडील गणेश राऊत यांनी ‘लोकमत’कडे दिली.रविवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात पूनमने निर्णायक खेळी केली. भारताचे मुख्य फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पूनमने खंबीरपणे उभे राहत ४७ धावांची खेळी केली. भारताने पाकिस्तानला ९५ धावांनी नमवल्यानंतर पूनमच्या बोरीवली एमएचबी कॉलनी येथील घरासमोर रहिवाशांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पूनमच्या खेळीविषयी गणेश यांनी सांगितले की, ‘तीच्या खेळीचा अभिमान आहे. ती खेळपट्टीवर उभी राहिल्याने खूप फरक पडला. तीचे अर्धशतक ३ धावांनी हुकले, परंतु त्याची खंत नाही. ती एक बाजू लढवत होती याचा अधिक आनंद आहे.’ तसेच, ‘स्मृती मानधना, मिताली राज झटपट परतल्यानंतर दडपण आले होते. परंतु, पूनमचे प्रशिक्षक संजय गायतोंडे सर यांनी जिंकण्याचा विश्वास दिल्यानंतर जीवात जीव आला. भारताने १३० हून अधिक धावा केल्या, तर पाकिस्तानला जिंकणे कठीण होईल, असे सरांनी सांगितले आणि तसेच झाले,’ असेही गणेश यांनी यावेळी सांगितले. पूनमला लहानपणापासून क्रिकेटसाठी पाठिंबा देणारे गणेश अमेरिकन स्कूलमध्ये कार चालक म्हणून नोकरी करतात. पूनमची आई गीता गृहिणी असून तिचा लहान भाऊ विपुल परदेशात हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे. आपले क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मुलीने पुर्ण केल्याचे अभिमानाने सांगताना गणेश म्हणतात की, ‘आज परिसरातील अनेक मुलींसह मुलेही पूनमकडे पाहून क्रिकेटकडे वळाली आहेत. तीच्याकडून टिप्स घेण्यासाठी अनेकजण घरी येतात आणि पूनम प्रत्येकाशी गप्पा मारते. तीला लक्झरी लाईफची फारशी आवड नाही. तीला फक्त देशासाठी क्रिकेट खेळायची आहे. तीचा जन्म केवळ क्रिकेट खेळण्यासाठी झालेला आहे.’रविवारी आम्ही माथेरानला पूनमचे प्रशिक्षक गायतोंडे सरांसह सामना पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी, भारताच्या फलंदाजीनुसार आम्ही मुंबईचा प्रवास ठरवला. फलंदाजी झाल्यावर आम्ही मुंबईला निघालो. घरी येईपर्यंत भारताने बाजी मारली होती आणि परिसरातील लोकांनी आमचे जोरदार स्वागत केले. - गणेश राऊतबोरीवली एमएचबी कॉलनी येथे मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.वडिल गणेश यांनी पूनमला खेळण्यास पाठिंबा दिला, तर आई गीता यांनी कायम तिच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. शिवसेवा, पय्याडे अशा क्लबमधून पूनमने स्थान निर्माण केले.१२वीला असताना पूनमची भारताच्या संभाव्य संघात निवड झाली.प्रत्येक सामन्याआधी पूनम कुटुंबियांना कॉल करते.साईभक्त असलेली पूनम प्रत्येक दौऱ्यावर जाण्याआधी न चुकता शिर्डीला जाते.