शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

हैदराबादचा ‘सनसेट’

By admin | Updated: May 18, 2015 03:26 IST

अत्यंत एकतर्फी झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबई इंडियन्सने गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर लैंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांच्या

हैदराबाद : अत्यंत एकतर्फी झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबई इंडियन्सने गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर लैंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांच्या दणकेबाज शतकी सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा ९ विकेट्सने फडशा पाडून दिमाखात प्ले आॅफमध्ये प्रवेश केला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत १६ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून, उद्या, मंगळवारी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईचा सामना तगड्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध घरच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी ११४ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मजबूत फलंदाजी असलेल्या मुंबईसमोर आधीच कमी धावसंख्येत बाद झाल्याने हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये जोश दिसून आला नाही. त्यात सिमेन्स आणि पार्थिव यांनी ८० चेंडूत १०६ धावांची आक्रमक भागीदारी करून हैदराबादच्या आव्हानातली हवाच काढली. पार्थिवने अखेरपर्यंत नाबाद राहताना ३७ चेंडंूत ९ खणखणीत चौकार मारताना ५१ धावांचा तडाखा दिला, तर सिमेन्सने ४४ चेंडूत ४ चौकार व २ षट्कार खेचताना ४८ धावा काढल्या. मुंबईला विजयासाठी ८ धावांची गरज असताना सिमेन्स कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर कर्णला षट्कार ठोकून मुंबईचा विजय निश्चित केला. मुंबईने १३.५ षटकांत लक्ष्य गाठले.तत्पूर्वी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याने लसिथ मलिंगाला पहिल्याच षटकात चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मलिंगाने धोकादायक फलंदाज शिखर धवनची यष्टी उखाडताना मुंबईला मोठे यश मिळवून दिले. पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर मिचेल मॅक्क्लेनघनला उंच फटका मारण्याच्या नादात कर्णधार वॉर्नर झेल देऊन परतला आणि हैदराबादचा संघ २ बाद ७ धावा अशा अडचणीत आला. मॅक्क्लेनघनने यानंतर इआॅन मॉर्गनचा (९) देखील अडसर दूर केला. मुंबईकरांच्या धडाक्यापुढे हैदराबादला पॉवर प्लेमध्ये २६ धावाच काढता आल्या. दहाव्या षटकात जगदीश सुचिथने अप्रतिम मारा करत धोकादायक मोईसेस हेन्रीक्स (११) आणि नमन ओझा (०) यांना बाद करून हैदराबादची ५ बाद ५१ अशी अवस्था केली. यानंतर ठरावीक अंतराने मुंबईने यजमानांना धक्के दिले. लोकेश राहुल (२५) , कर्ण शर्मा (१५), आशिष रेड्डी (१७) आणि डेल स्टेन (नाबाद १९) यांच्या फटकेबाजीने यजमानांनी शंभरी पार केली. मॅक्क्लेनघनने यशस्वी मारा करताना १६ धावांत ३ फलंदाज बाद केले, तर मलिंगा (२/१७), सुचिथ (२/१४) यांनीदेखील हैदराबादला जखडवून ठेवण्यात मोलाचे योगदान दिले.