ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 8- विजयाची आशा बाळगून खेळणा-या सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्ससमोर 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कर्णधार वार्नरनं 33 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचत 48 धावांची आघाडी उभारली आहे. शिखर धवननं नाबाद 57 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकार मारून 82 धावा काढून हाफसेंचुरी पार केली. विल्यमसन 2 धावा काढून तंबूत परतला आहे. युवराज सिंगनं 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 39 धावा कुटल्यात. हेनरिक नाबाद खेळी करत 1 धावा काढली आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅक्लेघननं युवराज सिंगला धावचीत केलं. हरभजननं भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेव्हिड वॉर्नर आणि विल्यमसनला तंबूत पाठवलं आहे.