शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

हैदराबादच किंग

By admin | Updated: April 29, 2017 00:57 IST

शिखर धवन, केन विलियम्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर सनरायजर्स

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 28 - शिखर धवन, केन विलियम्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी येथे किंग्ज इलेव्हन पंजाबचा २६ धावांनी पराभव करताना आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. ४ षटकांत १६ धावा देत १ गडी बाद करणारा लेगस्पिनर राशीद खान सामनावीर ठरला.

सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेल्या २0८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ ९ बाद १८१ धावाच करूशकला. त्यांच्याकडून शॉन मार्शने ५0 चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांसह ८४ धावांची झुंजार खेळी केली. मार्शशिवाय मार्टिन गुप्टिलने २३ आणि इयॉन मॉर्गनने २६ धावा केल्या. हैदराबादकडून सिद्धार्थ कौल आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारने २ गडी बाद केले. सनरायजर्सचा सत्रात प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर हा पहिला विजय आहे. तत्पूर्वी, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने ३ बाद २0७ धावा केल्या. धवनने ७७ आणि वॉर्नरने ५१ धावांची खेळी, तसेच सलामीसाठी १0७ धावांची भागीदारीही केली. केन विलियम्सननेही चार चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक २ गडी बाद केले. नाणेफेक गमावून फलंदाजीस उतरलेल्या सनरायजर्स संघाला वॉर्नर आणि धवन यांनी वेगवान सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६0 धावा ठोकल्या. सुरुवातीला धवनने आक्रमक धोरण अवलंबताना अनुरितला २ चौकार मारल्यानंतर इशांत शर्माचे षटकाराने स्वागत केले. वॉर्नरनही डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला सलग चेंडूवर चौकार आणि दोन षटकार ठोकले; परंतु पुढच्याच चेंडूवर त्याला रिद्धिमान साहाने जीवदान दिले. वॉर्नरने मॅक्सवेलच्या चेंडूवर एक धाव घेत २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि नवव्या षटकात संघाचे शतक फलकावर लगावले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकसनरायजर्स हैदराबाद : २0 षटकांत ३ बाद २0७. (शिखर धवन ७७, केन विलियम्सन ५४, डेव्हिड वॉर्नर ५१, युवराजसिंग १५. मॅक्सवेल २/२९, मोहित शर्मा १/३४). किंग्ज इलेव्हन पंजाब : २0 षटकांत ९ बाद १८१. (शॉन मार्श ८४, मॉर्गन २६, गुप्टिल २३. आशिष नेहरा ३/४२, सिद्धार्थ कौल ३/३६, भुवनेश्वर कुमार २/२७).