नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिन याने स्ट्रांजा स्मृती चषक स्पर्धेच्या ५६ किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत तो युक्रेनच्या मयकोला बुतसेंकों याच्याकडून २-३ असे थोडकयात पराभूत झाला. ही स्पर्धा बल्गेरियातील सोफिया येथे सुरू आहे.या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी तीन पदकांसह आपले अभियान समाप्त केले. सेमीफायनलमध्ये हुसामुद्दिन याने उपांत्य फेरीत स्थानिक खेळाडू स्टिफन इवानोव याला पराभूत केल होते. तत्पूर्वी, अमित पंघाल याला ४९ किलो गटात उपांत्य फेरीत टिनो बानाबाकोव याच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला गटात मीना कुमारी मेसनाम हिने उपांत्य फेरीत बल्गेरियाच्या स्टेनिमीरा पेत्रोवा हिच्याकडून पराभव स्विकारला या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)भारताने या स्पर्धेसाठी १५ जणांचे पथक पाठवले होते यात दहा पुरुष तर पाच महिला खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत ३१ देशांच्या २00 हून अधिक मुष्टीयोध्यांनी सहभाग घेतला होता.
हुसामुद्दिनला रौप्य
By admin | Updated: February 28, 2017 04:05 IST