दुबई : दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक्स कालिस मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणार असून, या लीगमध्ये यशस्वी होण्याची अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे़ आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर कालिस आगामी कॅरेबियन प्रिमियर लीगमध्येदेखील खेळणार आहे़ कॅलिस म्हणाला, हे एक शानदार पाऊल आहे़ यामध्ये यशस्वी होण्याचे सर्व तत्व आहेत़ खेळाडू या लीगबाबत खूपच उत्साहित आहेत़ आम्हाला याची सुरु होण्याची प्रतीक्षा आहे़ मी या स्पर्धेला यशस्वी बनविण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी योगदान देणार आहे़
एमसीएलमध्ये यशस्वी होण्याची ‘जॅक’ला आशा
By admin | Updated: June 19, 2015 02:06 IST